Psychological Thriller Films On Hotstar: विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला विनोदी, भयपट, थ्रिलर, सायकोलॉजिकल थ्रिलर असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहायला मिळतात. तुम्हाला जर सायकॉलॉजिकल थ्रिलर्स सिनेमे पाहायला आवडत असतील, तर तुमच्याकडे फक्त एकाच ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे.
२०१५ मध्ये रिलीज झालेला ‘दृश्यम’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, ज्यामध्ये अजय देवगण आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. लोकांना हा चित्रपट आणि त्याची कथा खूप आवडली आणि त्याचा दुसरा भाग देखील २०२२ मध्ये आला. दुसरा भागही चांगला गाजला होता. तुम्हालाही जर ‘दृश्यम’सारखे सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील, तर अशा पाच चित्रपटांबद्दल जाणून घ्या.
हेही वाचा – दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
जॅग्ड माइंड
Jagged Mind on OTT: जॅग्ड माइंड हा २०२३ मध्ये रिलीज झालेला सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन कालीने केले आहे. या चित्रपटात मेसी रिचर्डसन-सेलर्स आणि शॅनन वुडवर्ड मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा बिली नावाच्या मुलीची आहे, जी एपिसोडिक मेमरी लॉस या आजाराने ग्रस्त आहे. हा सिनेमा हॉटस्टारवर पाहता येईल.
मेमोरीज
Memories on OTT: २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘मेमरीज’ या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, मेघना राज आणि विजयराघवन यांच्यासह अनेक स्टार्स होते. या सिनेमाची कथा सॅम ॲलेक्स या मद्यपी पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल.
द ट्वेल्व्थ मॅन
12th Man on OTT : द ट्वेलथ मॅन हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन जीतू जोसेफने केले आहे. या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा एक फोन कॉल, १२ मित्र आणि एका खुनाची आहे, ज्याचा क्लायमॅक्स तुम्हाला हेलावून टाकेल. हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
लास्ट बस
Last Bus on OTT: २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा तुम्हाला हादरवून सोडेल. सहा प्रवासी एका बसमध्ये चढतात आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी खूप उत्सुक असतात. मात्र, त्यांच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं. त्यांना या प्रवासात भयंकर अनुभव येतात. ‘लास्ट बस’ हा चित्रपट तुम्ही हॉटस्टावर पाहू शकता.
हेही वाचा – सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
रोर्शाक
Rorschach Movie on OTT : रोर्शाक’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शन निस्साम बशीरने केलं आहे. या चित्रपटात मामूटी, ग्रेस अँटनीसह अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट म्हणजे माणसाने आत्म्याशी घेतलेल्या बदल्याची गोष्ट आहे. मामूटी यांनी चित्रपटात ल्यूक अँटनी नावाचे पात्र साकारले आहे, तेच आत्म्याकडून बदला घेतात. बदला घेण्यासाठी ते कोणत्या थराला जातात ते सिनेमात पाहायला मिळतं. ‘रोर्शाक’ चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर उपलब्ध आहे. तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टावर हा चित्रपट पाहू शकता.