Best Thriller Movie On Prime Video: घरबसल्या ओटीटीवर काहीतरी चांगलं पाहावं, असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कडक उन्हात घराबाहेर पडायचं नसेल आणि खिळवून ठेवणारा चित्रपट पाहायचा असेल तर आम्ही ज्या सिनेमाबद्दल बोलतोय, ते नक्की वाचा.

खरं तर ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे जगभरातील चित्रपट, शो, वेब सीरिज तुम्हाला फोनमध्ये पाहता येतात. आतापर्यंत आम्ही तुम्हाला अॅक्शन, क्राइम, थ्रिलर, ड्रामा, कॉमेडी, हॉरर अशा विविध जॉनरच्या अनेक सिनेमांबद्दल सांगितलं आहे. आता आम्ही ज्या थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगतोय, त्याची कथा तुम्हाला नक्की आवडेल.

जर तुम्हाला थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. या सिनेमाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर तुम्ही ‘दृश्यम’ आणि ‘महाराजा’ सारखे सिनेमे विसराल. हा उत्तम दक्षिण भारतीय चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत पडद्यावर खिळवून ठेवेल. त्याला IMDB वर उत्तम रेटिंग मिळालं आहे. या चित्रपटाचे नाव काय आहे आणि तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल ते जाणून घ्या.

कोणता आहे हा दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपट?

आम्ही आज ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो तमिळ क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. त्याचं दिग्दर्शन दयाल पद्मनाभन यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रताप कृष्णा आणि मनोज कुमार यांनी इन्फॅच स्टुडिओच्या माध्यमातून केली असून. या चित्रपटाचे नाव ‘कोंड्राल पावम’ आहे. यात वरलक्ष्मी सरथकुमार, संतोष प्रताप, ईश्वरी राव आणि चार्ली यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला होता आणि याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

कोंड्राल पावमची कथा

‘कोंड्राल पावम’मध्ये तमिळनाडूतील एका गावातली गोष्ट दाखवण्यात आली आहे. या गावात एक गरीब कुटुंब राहतं. त्यांची भेट एका ज्योतिषाशी होते. तो ज्योतिषी या कुटुंबाला सांगतो की त्यांच नशीब पालटणार आहे. यानंतर त्यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती येते, ती तिथे रात्रभर थांबण्याची परवानगी मागते. आधी हे कुटुंबीय त्या व्यक्तीला थांबायला नकार देतात, मग तयार होतात. यानंतर त्यांच्या आयुष्यात जे ट्विस्ट येतात, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल चित्रपट?

‘कोंड्राल पावम’ हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या पाहता येईल. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळालं आहे.