ओटीटी प्लॅटफॉर्म्स आजच्या काळात मनोरंजनासाठी एक महत्त्वाची जागा बनले आहे. चित्रपट आणि सीरिजच्या शौकिनांसाठी येथे भरपूर विविधता असते. ओटीटीवर तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि अनेक प्रकारचा कंटेंट पाहायला मिळतो. जर तुम्ही चित्रपटांचे चाहते असाल, तर वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक प्रकारच्या फिल्म्स पाहायला मिळतील. तसंच, सीरिज आवडत असतील, तर त्याही तुम्हाला सहज उपलब्ध होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही काळापासून ओटीटीवर कोरियन आणि पाकिस्तानी ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत, पण जर तुम्ही या कंटेंटला कंटाळले असाल, तर आम्ही तुम्हाला काही उत्तम Turkish शोची माहिती देणार आहोत. हे शो इतके लोकप्रिय आहेत की, जर तुम्ही त्यांचा एक भाग पहिला, तर तुम्ही नक्कीच संपूर्ण सीरिज पाहिल्याशिवाय राहणार नाही. हे शो पाहिल्यानंतर तुम्ही कोरियन आणि पाकिस्तानी ड्रामांना विसरून जाल.

हेही वाचा…Video: ‘मानवत मर्डर’ माझी पहिली केस’ शरद पवारांनी उलगडला १९७२ चा थरार; पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णींबद्दल म्हणाले…

बस्किन (Baskin)

२०१५ साली रिलीज झालेला हा एक Turkish हॉरर चित्रपट आहे. केन एव्हरिनॉल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील भयावह घटना तुम्हाला नक्कीच थरारक वाटतील. ही कथा पाच पोलिस अधिकाऱ्यांभोवती फिरते, जे रात्री गस्त घालताना एका इमारतीत पोहोचतात आणि त्यानंतर जो काही थरारक अनुभव घडतो, तो या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

ब्रेव एंड ब्यूटीफुल (Brave and Beautiful)

ही एक Turkish वेब सीरिज आहे, ज्यात एक अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. कथेत दाखवलं आहे की, एक तरुण आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका शहरात जातो आणि तिथे त्याची भेट त्या कुटुंबाशी होते, जे त्याच्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार असतात. या तरुणाला त्या कुटुंबातील एका मुलीवर प्रेम होतं. ही वेब सीरिज एमएक्स प्लेयरवर पाहता येईल.

हेही वाचा…जेव्हा माणूस घेतो आत्म्याकडून बदला, हिंमत असेल तरच पाहा OTT वरील हा चित्रपट

आतिश-ए-इश्क (Aatish-e-Ishq)

ही सीरिज एका सिंगल मदरच्या जीवनावर आधारित आहे. एक आई कशाप्रकारे आपल्या जीवनातील अडचणींचा एकटीने सामना करते अशी या वेब सीरिजची कथा आहे . ही सीरिज देखील एमएक्स प्लेयरवर उपलब्ध आहे.

दब्बे: द कर्स ऑफ द जिन्न (Dabbe: The Curse of the Jinn)

हा एक भयपट आहे , ज्यात एका महिलेच्या घरात एका खोलीत असामान्य घटना घडू लागतात. सुरुवातीला तिचा पती या गोष्टींना नाकारतो, पण परिस्थिती तेव्हा हाताबाहेर जाते, जेव्हा त्यांना कळतं की त्या घरात जिन्न आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

हेही वाचा…या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं? वाचा चित्रपट अन् वेब सीरिजची यादी

ब्लॅक मनी लव्ह (Black Money Love)

२०१५ साली रिलीज झालेली ही एक क्राइम, रोमँटिक आणि थ्रिलर वेब सीरिज आहे. या सीरिजचे दोन सीझन रिलीज झाले आहेत आणि ही बेस्ट टर्किश वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best turkish series and movies to watch on ott platforms alternative of korean drama psg