मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. अर्जुन कपूर बरोबर असलेला तिच्या नात्याबरोबरच ती तिच्या कामामुळे ही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आता नुकताच तिने तिचा ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे होत आहेत. यामुळे अनेकदा ती ट्रोलही होत आहे. पण आता मलायकाला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सडेतोड उत्तर दिलं आहे.

मलायकाच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या कार्यक्रमात वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होतात. आतापर्यंत फराह खान, करण जोहर, नोरा फतेही यांसारख्या स्टार्सनी या कार्यक्रमात हजेरी लावली. यानंतर आता नुकतीच कॉमेडियन भारती सिंग या कार्यक्रमाच्या नवीन एपिसोडमध्ये सहभागी झालेली दिसली.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

आणखी वाचा : महेश भट्ट लाडक्या नातीला देणार ‘ही’ खास भेट, खुलासा करत म्हणाले, “मी या जगात नसल्यावरही राहा…”

मलायकाने नुकताच या नव्या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला. यात मलायका भारतीसमोर ट्रोलर्सनी केलेल्या कमेंट्स वाचताना दिसतेय. एका ट्रोलरने मलायकाच्या एका फोटोवर “या वयात तू कसे कपडे घालतेस!” अशी केलेली कमेंट तिने वाचली. त्या कमेंटवर भारती सिंगने तिच्या हटके अंदाजात उत्तर दिलं. ती म्हणाली, “तुम्ही काय तिचे वडील आहात? तिची मर्जी, तिला जे हवे ते कपडे ती घालू शकते. जे लोक ट्रोल करतात त्यांनी एकदा आपल्या समोर बसून ट्रोल केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यासमोरच आपण त्यांची बोलती बंद करू शकू.”

हेही वाचा : “माझं लग्न अयशस्वी…”; फराह खानने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

मलायका अरोराच्या शोचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा प्रोमो पाहिल्यानंतर आगामी एपिसोडमध्ये बराच मसाला असणार आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी एपिसोडबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Story img Loader