‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाला १७ जूनपासून सुरुवात झाली आहे. या शोमध्ये यंदा बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकीने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन आणि आलिया वैयक्तिक मतभेदांमुळे चांगलेच चर्चेत होते. त्यातच आलिया सिद्दिकीने इन्स्टाग्रामवर मिस्ट्री मॅनबद्दल प्रेमाचा खुलासा केल्याने बिग बॉसमध्ये तिला अन्य स्पर्धकांकडून वैयक्तिक आयुष्याबाबत विचारणा केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “…म्हणून मी मालवणी बायको केली” ‘त्या’ प्रश्नावर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ मध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस आलिया एकदम शांत होती. तिसऱ्या दिवशी एका सहस्पर्धकासह बातचीत करताना आलियाने नवाज आणि तिच्या नात्याबाबत काही खुलासे केले आहेत. यावेळी आलिया सिद्दिकीने सहस्पर्धकाला ती, नवाजुद्दिनला केव्हा भेटली त्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीला कशी सुरुवात झाली याबाबत सांगितले आहे.

हेही वाचा : “ना पैसा, ना काम…” प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, “बिग बॉस ओटीटीची ऑफर आली अन्…”

सहस्पर्धक सायरस ब्रोचाशी बोलताना आलिया सिद्दिकी म्हणाली, “२००३ मध्ये मी नवाजला भेटले. तेव्हा त्याचा भाऊ त्याचा असिस्टंट होता. नवाज तेव्हा एकता नगरमध्ये आणि मी पीजीमध्ये राहत होते. पीजी सोडल्यावर नवाजच्या भावाने मला काही दिवस त्यांच्याबरोबर राहण्यास सांगितले. मी नवाजचा फोटो पाहिला तेव्हा त्याचे डोळे मला खूप आवडले. त्यानंतर आम्ही भेटलो, प्रेमात पडलो आणि एकत्र राहू लागलो असा आमचा प्रवास होता आणि आता मतभेदांमुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेणार आहोत.”

आलियाला सायरस ब्रोचाने पुढे आलियाने अलीकडेच प्रेमाची कबुली दिलेल्या मिस्ट्री मॅनबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, “तो भारतीय नसून इटालियन आहे आणि दिसायला खूप छान आहे. माझ्या एका मैत्रीणीला तो खूप आवडायचा, तेव्हा आमच्यात काही नव्हते. आम्ही नंतर हळूहळू बोलू लागलो. तो सॉफ्टवेअर इंजिनीअर असून माझ्याबद्दल त्याच्या मनात खूप आदर आहे. म्हणूनच सर्वांसमोर मी माझे दुसरे प्रेम मान्य केले, मी आता घाबरत नाही, कारण तो नेहमी माझ्याबरोबर असतो.”

हेही वाचा : बॉलीवूड की साऊथ काय निवडशील? दृश्यम फेम अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले; म्हणाली, “कितीही मोठा स्टार असो…”

मिस्ट्री मॅनबरोबर लग्न करणार का? याबाबत सायरस ब्रोचाला आलिया म्हणाली, “नाही रे! या जन्मात मी पुन्हा लग्न करणार नाही. माझा आता लग्नावर विश्वास नाही.” दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ प्रेक्षकांना आता जिओ सिनेमा आणि व्हूटवर विनामूल्य पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss ott season 2 aaliya siddiqui remembers her love story with nawazuddin siddiqui sva 00
Show comments