‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळेच आता सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस ओटीटी सीझन-२ यंदा सलमान खान होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. बिग बॉस ओटीटीचे पहिले पर्व दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने होस्ट केले होते. अलीकडेच निर्मात्यांनी नव्या सीझनचा प्रोमो रिलीज केला आहे.
हेही वाचा : “तुझ्याकडे काय आहे जे इतर अभिनेत्यांकडे नाही?” फिल्मी स्टाईल उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, “मेरे पास…”
‘बिग बॉस ओटीटी २’ यावेळी जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. नवा सीझन सलमान होस्ट करणार असल्याने यंदा काहीतरी वेगळे आणि धमाकेदार पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या स्पर्धकांच्या यादीत शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, कुणाल कामरा, सूरज पंचोली, योहानी, सीमा तपारिया, महिप कपूर, जिया शंकर, पूजा गौर, अविनाश सचदेव, आवेज दरबार, अंजली अरोरा, पलक पुरसवानी यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, परंतु निर्मात्यांकडून अद्याप स्पर्धकांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : “तू सिगारेट सोडलीस का?” शाहरुख खानने दिलेले उत्तर पाहून चाहते चक्रावले, म्हणाले “जरा काळजी…”
‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये यंदा पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्पर्धकांना मिळणारे जीवनावश्यक साहित्य कंट्रोल करण्याची पॉवर देण्यात आली आहे. म्हणजेच बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दर आठवड्यात जो अन्नधान्यसाठा पुरवला जातो त्यामध्ये आता प्रेक्षकांना हस्तक्षेप करता येणार आहे, म्हणूनच “इस साल जनता होगी बॉस” असे निर्मात्यांनी प्रोमोमध्ये म्हटले आहे. बिग बॉसच्या घरातील कानाकोपऱ्यात कॅमेरे असतील. लाईव्ह चॅटिंगसह यंदा बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी खास असणार आहेत. घरात २४ तास स्पर्धक काय करीत आहेत हे सुद्धा प्रेक्षकांना लाईव्ह पाहता येणार आहे, यासाठी तुम्हाला जिओ सिनेमा किंवा व्हूट सिलेक्ट हा अॅप डाऊनलोड करावा लागेल.
हेही वाचा : “सीता मातेबरोबर स्वत:ची तुलना करू नकोस” क्रिती सेनॉनने शेअर केलेला ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले
बिग बॉस ओटीटी सीझन २ ची सुरुवात १७ जून २०२३ पासून होणार आहे. प्रेक्षक जिओ सिनेमावर हा सीझन पाहू शकतात. ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन-१ मध्ये ‘दिव्या अग्रवाल’ विजयी झाली होती. पहिल्या पर्वात शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद, जीशान खान, निशांत भट, प्रतीक सेहजपाल आणि नेहा भसीन यांसह एकूण १५ तगडे खेळाडू सहभागी झाले होते.