बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अलीकडेच या शोमध्ये एल्विश यादव व आशिका भाटिया या नव्या सदस्यांची एंट्री झाली. तसेच आणखी नव्या सदस्यांची एंट्री बिग बॉस ओटीटीच्या घरात होणार आहे. त्यामुळे हा शो येत्या काळात ओटीटीवर धुमाकूळ घालणार, असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण या शोचा सदस्य राहिलेल्या सायरस ब्रोचा यानं बिग बॉस ओटीटीच्या घराला नरकाची उपमा दिली आहे.
गेल्या आठवड्यात कौटुंबिक इमर्जन्सीमुळे बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वातून कॉमेडियन सायरस ब्रोचा बाहेर पडला. सायरसनं शोबाहेर आलेल्या इतर सदस्यांप्रमाणे कुठल्याही माध्यमांना मुलाखत न दिली नाही. मात्र, त्यानं बिग बॉस ओटीटीच्या घरातला वेदनादायी व भयानक अनुभव त्याच्या पॉडकास्टमधून सांगितला आहे.
आपल्या विनोदी शैलीतून सायरस म्हणाला, ” मी नरकातून बाहेर पडल्यासारखं वाटत आहे. या नरकाबाबत सांगायचं झालं, तर हा नरक पूर्णपणे शाकाहारी आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूप वेदनादायी व भयानक होता. हा शो एकाग्रतेचं शिबिर असल्यासारखं वाटतं होतं. तसंच ‘बिग बॉस’च्या घरातलं जेवण व्यवस्थित नव्हतं. झोपण्याचे तास खूप विचित्र होते. रात्रीचा फक्त तीन तास झोपायचो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप झोप यायची. फक्त एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे घरातले सर्व सदस्य खूप चांगले होते. त्यांच्याबरोबर माझी चांगली मैत्री झाली होती.”
हेही वाचा – तमन्ना भाटियाबरोबरचं अफेअर पब्लिसिटी स्टंट? विजय वर्मा उत्तर देत म्हणाला…
दरम्यान, बिग बॉस शोमधून बाहेर होण्यापूर्वीच सायरसनं सलमान खानकडे शो सोडण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. या बाबतीत सलमाननं सायरसला खूप समजावलं होतं. एवढंच नाही तर कुणाल विजयकरला सायरसला समजवण्यासाठी शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. पण, सायरस त्याच्या मतावर ठाम होता. अखेर त्याला कौटुंबिक इमर्जन्सीमुळे शोमधून बाहेर काढण्यात आलं.