वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १७वं पूर्व काल, २८ जानेवारीला संपलं आहे. या पर्वाची ट्रॉफी लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी डोंगरीला घेऊन गेला आहे. डोंगरीत त्याचं जल्लोषात स्वागत झालं आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच दुसऱ्याबाजूला काहीजण मुनव्वर फारुकीपेक्षा चांगला खेळ अभिषेक कुमार खेळला, असं म्हणत आहेत. अनेक कलाकारांना देखील अभिषेकचा खेळ आवडला होता. पण प्रेक्षकांच्या मतांनुसार मुनव्वर विजयी झाला. यावरून ‘बिग बॉस ओटीटी २’ मधील एका सदस्याने सलमान खानला टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडच्या भाईजानला टोला लगावणारा ‘बिग बॉस ओटीटी २’चा हा सदस्य म्हणजे ‘फुकरा इंसान’ अभिषेक मल्हान. अभिषेकने मुनव्वर विजयी घोषित झाल्यानंतर ‘एक्स’वर एक पोस्ट केली. ज्यामधून त्याने थेट सलमान खानवर निशाणा साधला.

हेही वाचा – Bigg Boss 17चा विजेता मुनव्वर फारुकीचा पहिला पगार किती होता माहितेय? जाणून घ्या…

अभिषेक मल्हान म्हणाला की, सलमान भाईसमोर अभिषेक नावाची व्यक्ती जिंकू शकत नाही. ‘बिग बॉस १८’मध्ये आयुष्यमान नावाने प्रवेश करतो. अभिषेक मल्हानची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस १७’च्या महाअंतिम सोहळ्यातील मुनव्वर फारुकीच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अभिषेक मल्हान हा ‘बिग बॉस ओटीटी २’चा उपविजेता आहे. या शोमध्ये अभिषेक व एल्विश यादव यांच्यात चुरस रंगली होती. पण वाइल्ड कार्ड म्हणून आलेल्या एल्विशने बाजी मारली. ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड सदस्य विजयी झाला.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott 2 fame youtuber abhishek malhan taunt to salman khan after munawar faruqui wins trophy pps