बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज जोरदार रंगणार आहे. पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे या स्पर्धेकांमधून कोण विजेता ठरणार? याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. पण तत्पूर्वी या शोमधील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) व एल्विश यादव (Elvish Yadav) या दोघांची नेटवर्थ किती आहे? सर्वात जास्त कोण श्रीमंत आहे? हे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत…”, अभिनेत्रीने खंत व्यक्त करत सांगितला अनुभव, म्हणाली…

फुकरा इन्सान म्हणजेच अभिषेक मल्हान व एल्विश यादव या दोघांची लोकप्रियता खूप आहे. दोघांना भरभरून मतं मिळत आहेत. माहितीनुसार, मतांच्या यादीत एल्विश यादव अव्वल स्थानावर आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक मतं १३ मिलियन मिळाली आहेत आणि फुकरा इन्सानला १० मिलियन मतं मिळाली आहेत. त्यामुळे अभिषेक व एल्विशमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.

अभिषेक व एल्विश दोघं लोकप्रिय युट्यूबर आहेत. दोघांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. तसेच दोघांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. अभिषेक व एल्विश या दोघांचं नेटवर्थ जवळपास प्रत्येकी २ कोटी रुपये आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2च्या ग्रँड फिनालेपूर्वीच ‘हा’ स्पर्धेक रुग्णालयात दाखल; बहीण म्हणाली, “तुमच्यासाठी परफॉर्म करू शकणार नाही”

एल्विश यादवच्या यूट्युब चॅनेलवर १२.८ मिलियन म्हणजे १ कोटी २८ लाख सब्सक्रायबर्स आहेत. तर अभिषेक यात थोडा मागे आहे. त्याच्या यूट्युब चॅनेलवर ७,५८ मिलियन म्हणजेच ७५ लाख सब्सक्रायबर्स आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा व्हिसा झाला होता रिजेक्ट; पृथ्वीकनं सांगितलं कारण, म्हणाला…

दरम्यान, बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अभिषेक मल्हान व एल्विश यादव या दोघांपैकी एक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मतांच्या यादीमध्ये दोघं अव्वल स्थानावर आहेत. जरी यामध्ये एल्विश अभिषेकच्या पुढे असला तरी शेवटच्या क्षणाला पारडं पलटू शकत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott 2 final abhishek malhan and elvish yadav net worth know pps