छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत आणि वादग्रस्त असलेल्या शो पैकी एक म्हणजे बिग बॉस. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता नुकताच जाहीर झाला. बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड एण्ट्री घेतलेला स्पर्धक एल्विश यादव हा यंदाच्या ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता ठरला. बिग बॉस ओटीटीचा विजेता ठरल्यानंतर आता एल्विशची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बिग बॉस ओटीटीच्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे या स्पर्धकांचा समावेश होतो. त्यानंतर अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये मतांची जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अखेर एल्विशने विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला. यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
आणखी वाचा : Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व ठरले ऐतिहासिक; पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एल्विश यादव ठरला विजेता!

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

“एल्विश आर्मी तुमचे मनापासून धन्यवाद. हा तुमचा विजय आहे. तो सुरुवातीपासून तुमचाच होता. एल्विश यादव तुम्हा सर्वांशिवाय काहीच नाही. मी तुम्हाला हे अनेकदा सांगितलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही भरभरुन देत असलेल्या प्रेमासाठी मी खरंतर पात्र नाही, पण तुम्ही मला ते अधिकाधिक देत आहात. यासाठी मी तुमचे आभार शब्दात मांडू शकत नाही.

बघा तुमच्या याच प्रेमाखातर मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी एल्विश आर्मीची आहे. हे सर्व काही तुमचं आहे. मी पण तुमचाच आहे. तुम्ही फक्त माझ्याबरोबर राहा. माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत. फक्त हे लक्षात ठेवा तुमच्यामुळेच मी आहे. सिस्टम हँग केलं ना..”, असे एल्विश यादवने म्हटले आहे.

elvish yadav
एल्विश यादवची पोस्ट

एल्विशने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात तो बिग बॉसची ट्रॉफी घेऊन बसलेला दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्याने ‘एल्विश आर्मी इज द बेस्ट’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”

दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी २’ ची सुरुवात १७ जून रोजी झाली होती. यात बेबका धुर्वे, पूजा भट्ट, अभिषेक, फलक नाझ, अविनाश सचदेव, जिया शंकर, जेडी हदीद, पलक पुरस्वानी आणि मनीषा राणी हे स्पर्धक सहभागी झाले होते.

एल्विशने बिग बॉस ओटीटीच्या ८ आठवड्यांच्या खेळात एल्विशने चौथ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. अभिषेक आणि एल्विश यांपैकी कोण जिंकणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या अटीतटीच्या लढाईत एल्विश यादवने बाजी मारली. त्याने बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेत्या स्पर्धकाला बिग बॉसकडून ट्रॉफी आणि तब्बल २५ लाखांचा धनादेश देण्यात आला.

Story img Loader