Bigg Boss Ott Season 2 Winner : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यंदाचे पर्व अनेकांनी चर्चेत राहिले. पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे या टॉप ५ स्पर्धकांचा अंतिम फेरीत प्रवेश झाला होता. यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यामध्ये मतांची अंतिम रंगत सुरु झाली आणि एल्विशने यात बाजी मारली.
हेही वाचा : Bigg Boss OTT 2: अभिषेक मल्हान की एल्विश यादव कोण आहे जास्त श्रीमंत? जाणून घ्या दोघांची नेटवर्थ
अभिषेक आणि एल्विश यांपैकी कोण जिंकणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या अटीतटीच्या लढाईत एल्विश यादवने बाजी मारली आणि त्याने बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपले नाव करते. विजेत्या स्पर्धकाला बिग बॉसकडून ट्रॉफी आणि तब्बल २५ लाखांचा धनादेश देण्यात आला.
हेही वाचा : “क्रांतीचा फोन आल्यावर…”, समीर वानखेडेंनी केला बायकोबद्दल खुलासा; म्हणाले, “तिच्याशी फोनवर बोलायला…”
विजेत्या एल्विश यादवला सलमान खानने ‘बिग बॉस ओटीटी २’ची ट्रॉफी देत त्याचे कौतुक केले. या वेळी त्याचे आई-वडील आणि असंख्य चाहते उपस्थित होते. दरम्यान, बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अभिषेक मल्हान किंवा एल्विश यादव या दोघांपैकी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मतांच्या यादीमध्ये दोघेही सुरुवातीपासूनच अव्वल स्थानावर होते.
हेही वाचा : ‘या’ कारणामुळे बरीच वर्षं शाहरुख खान काश्मीरला गेला नाही; किंग खानचा जुना व्हिडीओ चर्चेत
अखेर एल्विशने विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला. यंदा पहिल्यांदाच वाइल्ड स्पर्धक जिंकल्याने ‘बिग बॉस ओटीटी’चे हे पर्व ऐतिहासित ठरले. ८ आठवड्यांच्या खेळात एल्विशने चौथ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. यापूर्वी वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेला कुठलाही स्पर्धक बिग बॉसच्या इतिहासात विजेत ठरलेला नाही.