बिग बॉस ओटीटीचं दुसऱ्या पर्वाच्या या आठवड्यात बरचं काही पाहायला मिळाला. स्पर्धेकांच्या कुटुंबातील सदस्यांच्या एंट्रीमुळे या आठवड्यातील वातावरण भावनिक झालं होतं. तसेच दुसऱ्या बाजूला या शोचा पहिला फायनलिस्ट अभिषेक मल्हान ठरला. याशिवाय बरंच काही या आठवड्यात घडलं आहे. अशातच आता मनीषा रानीचे वडील प्रमोद कुमार यांनी सलमान खानविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

मागील आठवड्याच्या टास्क दरम्यान बेबिका आणि मनीषा रानीचे जोरदार भांडणं झालं होतं. यावेळी दोघींमध्ये धक्काबुकी सुद्धा झाली होती. यावरून गेल्या विकेंडच्या वारला सलमान खानने मनीषा आणि बेबिकाला चांगलंच सुनावलं होतं. पण प्रेक्षकांच म्हणणं आहे की, सलमानने बेबिकापेक्षा मनीषाला जास्त टार्गेट केलं. यावरच आता मनीषा रानीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
ram gopal verma pushpa 2 review
राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘पुष्पा २’चा अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाले, “त्याची प्रतिमा…”
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा – अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘सिंधुताई माझी माई’मध्ये दिसणार ‘या’ भूमिकेत

‘आयडब्ल्यूएम बझ’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी बातचित करताना प्रमोद कुमार यांनी सलमान खानच्या होस्टिंगवर वक्तव्य केलं आहे. त्यांना विचारण्यात आलं होतं की, ‘धक्काबुकीवरून बेबिकापेक्षा सलमान खानने मनीषा रानीला जास्त टार्गेट केलं असं वाटलं नाही का?’ यावर मनीषा रानीचे वडील म्हणाले की, “सलमान खानविषयी आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. पण एक गोष्ट जरूर सांगेन. सलमान खान बिग बॉसचा शो पाहत नाही असं वाटतं. जे त्यांना बोलायला दिलं जातं, तेच ते बोलतात. जे त्यांना दाखवलं जातं, तेवढं ते पाहतात. ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही.”

हेही वाचा – AI ने तयार केला महेश मांजरेकरांचा जबरदस्त लूक; स्वतःचाच फोटो पाहून म्हणाले, “माझी इच्छा…”

हेही वाचा – ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

दरम्यान, बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व संपण्यासाठी अवघे काही आठवडे बाकी आहे. त्यामुळे सध्या बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धेकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. आज जिया शंकर, मनीषा रानी, जैद हदीद आणि अविनाश सचदेव या चार स्पर्धकांमधून कोण शो बाहेर होणार, हे स्पष्ट होणार आहे.

Story img Loader