‘बिग बॉस ओटीटी २’ला सुरुवात झाली आहे. सलमान खानच्या या शोमध्ये स्पर्धकांची भांडणं पाहायला मिळतात. अनेक स्पर्धकांच्या प्रेम कहाण्याही बिग बॉसच्या घराने पाहिल्या आहेत. काहींनी शोमध्येच लग्नही केले. ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनमध्ये एक प्रेम कहाणी सुरू होताना दिसत आहे. मनीषा राणी आणि जैद हदीद ही दुसऱ्या पर्वातील पहिली जोडी असेल, असं दिसंतय.
‘Bigg Boss OTT 2’मध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? ‘वेड’ फेम जिया शंकर म्हणाली, “मला विश्वास आहे की…”
मनीषा राणी आणि जैद हदीद यांचा एक व्हिडीओ जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मनीषा जैदवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. जैदने चहा ऑफर केल्यावर मनीषा म्हणते, ‘माझ्याजवळ तू आहेस. लव्ह यू टू द मून.’ नंतर जैददेखील मनीषासोबत फ्लर्ट करतो. तो मनीषाला विचारतो, ‘तुला मला किस करायचं आहे का?’ हे ऐकून मनीषा खूप आनंदित होते आणि त्याच्या गालावर किस करते. ‘मी तुझ्यावर प्रेम करते, तसं कोणीही करत नाही’, असंही मनीषा म्हणते.
दरम्यान, पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’च्या घरात मनीषा व जैदची केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यामुळे येत्या काळात या दोघांमध्ये खरंच प्रेम फुलतं की दोघेही लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी गेम खेळतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घरात जैद, मनीषासह जिया शंकर, पूजा भट्ट, आलिया सिद्दीकी व इतर स्पर्धकही आहेत.