बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्याला सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणं पाहायला मिळतं आहेत. अलीकडेच घरात आशिका भाटिया व एल्विश यादव यांची वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. एल्विशनं घरात येताच आपला खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यानं अविनाशला निशाणा बनवलं आहे. या दरम्यान पूजा भट्ट व जिया शंकरमध्ये कडाक्याचं भांडणं झालं आहे. पूजानं जियावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत.

बिग बॉसनं घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. ज्यानंतर पूजा भट्ट फलक नाजला समजवू लागली की, “तू जियापासून दूर राहा. प्रत्येक आठवड्याला जियाची मैत्री बदलते. पहिल्यांदा ती एखाद्या सदस्याशी चांगली मैत्री करते आणि नंतर त्यालाच नॉमिनेट करते. त्याच्याशीच भांडते, मग क्षणार्धात लहान मुलांसारखं वागवून त्या सदस्याला समजवते. जेव्हा तिला असं वाटतं ती कॉर्नर होतेय, तेव्हा ती रडायला सुरुवात करते.”

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

हेही वाचा – ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटासाठी टॉम क्रूजनं आकारलं ‘इतक्या’ कोटीचं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

हेही वाचा – ‘सतीची पुण्याई’ चित्रपटातील ‘तो’ सीन करणं रवींद्र महाजनींच्या बेतलं होतं जीवावर; नेमकं काय घडलं?

पूजा एवढ्यावरच थांबत नाही. ती बेडरुममध्ये जाऊन अविनाश, फलक आणि जदच्या समोर जियाची पोलखोल करते. जिया सर्व सदस्यांचा वापर करून घेत असल्याचा आरोप पूजा करते. ती म्हणते की, “जिया ही स्वतःनुसार प्रत्येक सदस्याचा वापर करते. त्यानंतर त्याच्या मागून वाईट गोष्टी बोलत असते. ती टॉक्सिक (विषारी) आहे. ती समोरच्या व्यक्तीला उसकवते, मग त्याच्यात राग निर्माण करते. त्यानंतर ती व्यक्ती वाईट असल्याचं सांगत फिरते.”

हेही वाचा – “कित्येक रात्री डोळ्यात पाणी अन् मनात असंख्य विचार….” केदार शिंदेंची पत्नी व मुलीविषयी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

हे सर्व ऐकून जियाचाही पार चढतो. जेव्हा ती पूजाला गप्प बसवायला जाते, तेव्हा पूजा तिला ‘शटअप’ बोलते. त्यानंतर ती म्हणते की, “तू फलकबरोबर काय खेळतेस ते खेळ. तिला चांगली बाजू दाखवं. तू मला मूर्ख बनवू शकत नाही. अभिषेकबरोबर चांगली राहिलीस, त्यानंतर त्यालाच शिव्या घातल्या. जिया ही सर्वांना भडकवते; जिथे जाते, तिथे विष पसरवते.”