‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता व लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादव सतत कुठल्या ना कुठल्या वादामुळे चर्चेत असतो. एका बाजूला रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष पुरवठा केल्याचं प्रकरण तर दुसऱ्या बाजूला नवनवीन वादाच्या भोवऱ्यात एल्विश अडकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा जयपूरमधील एका रेस्टॉरंटमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एल्विश एका व्यक्तीला जोरात कानशिलात लगावताना दिसला होता. त्यानंतर आता एल्विशने गुरुग्राममध्ये राहणाऱ्या लोकप्रिय युट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्नला बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

अलीकडेच युट्यूबर मॅक्सटर्नने सोशल मीडियावर एल्विश यादवने मारहाण केल्याचा व जीवे मारण्याची धमकी दिल्या आरोप केला होता. पण यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. त्यामुळे मॅक्सटर्नने आता मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत, एल्विश आपल्या ८ ते १० मित्रांना घेऊन मॅक्सटर्नकडे पोहोचून, त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणामुळे मॅक्सटर्न जखमी झाला आहे, याचा देखील व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर ‘एक्स’वर एल्विशला ट्रोल केलं जात आहे. गुंडा असा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतं आहे. नेटकरी एल्विशविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. पण हे नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या..

Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

हेही वाचा – Video: अंबानींची धाकटी सून शाहरुख खानला म्हणाली ‘अंकल’, बादशहाने अक्षय कुमारचं नाव घेत दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

काही दिवसांपूर्वी एल्विश यादव व मुनव्वर फारुकी एका क्रिकेट सामन्यात एकत्र दिसले होते. यावरून मॅक्सटर्नने एल्विशची खिल्ली उडवली होती. मॅक्सटर्नने ‘एक्स’वर एल्विश व मुनव्वरचे अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करून ‘बिग बॉस ओटीटी २’च्या विजेत्या विरोधात बोलत होता. यामुळेच एल्विश भडकला. एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी एल्विशवर अशी टीका केली की, तो स्वतःला रामभक्त, सनातनी म्हणतो आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या मुनव्वरबरोबर फिरतो. हाच वाद आता शिगेला पोहोचला आहे. याच वादावरून एल्विशने मॅक्सटर्नला बेदम मारहाण केली आहे. यामुळे आता एल्विश पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे.

Story img Loader