‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता आणि लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ जयपूरमधील एका रेस्टॉरंटमधला आहे. ज्यामध्ये एल्विश एका व्यक्तीला जोरात कानशिलात लगावताना दिसत आहे. एल्विशच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एल्विश पुन्हा एकदा अडचणीत सापडणार, असं म्हटलं जातं आहे. पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

एल्विशन यादवचा हा व्हिडीओ एक्सवरील त्याच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एल्विश एका व्यक्तीच्या जोरात कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर तो रेस्टॉरंट बाहेर पडताना दिसतो. पण पुन्हा तो व्यक्ती एल्विशला काहीतरी बोलतो, ज्यामुळे एल्विश संतापून त्या व्यक्तीजवळ जात असतो. तितक्यात त्याचे मित्र त्याला अडवतात आणि रेस्टॉरंट बाहेर घेऊन जातात. या व्हिडीओमुळे एल्विश चर्चेत आला असून अनेक जण त्याच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे एल्विशने या व्हिडीओमागचं सत्य उघडं केलं आहे.

हेही वाचा – Video: शितली-पश्याची जमणार जोडी, लवकरच प्रेक्षकांच्या येणार भेटीस, नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर

एल्विशचा एक ऑडिओ क्लिप त्याच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये एल्विशने हे नेमकं प्रकरण काय आहे? हे स्पष्ट केलं आहे. एल्विश म्हणाला, “मला अजिबात भांडण करायची किंवा कोणाला मारायची हौस नाहीये. माझं माझ्या कामाशी काम असतं. मी नेहमी नीट चालतो. कोणाला फोटो काढायचे असतील तर त्यांना व्यवस्थित फोटो काढायलाही देतो. पण जो कोणी मागून कमेंट करतो, आई-बहिणीवरून शिव्या देतो तर मग मी त्याला सोडत नाही. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पोलीस आणि कमांडो देखील आहात. त्यामुळे जे घडलं ते चुकीच नाहीये. हे माझं वैयक्तिक प्रकरण होतं. तो मला बोलला म्हणून मी त्याला जाऊन मारलं. याचं मला दुःख किंवा मनस्ताप होतं नाही. मी असाच आहे. मी काहीच बोललो नाही. त्याने मला शिवीगाळ केली आणि मी माझ्या भाषेत त्याला उत्तर दिलं. ते तोंडाने बोलतात पण मी बोलत नाही.”

हेही वाचा – बॉलीवूड सुपरस्टारच्या कुटुंबियांना भेटली रिंकू राजगुरू, फोटो शेअर करत म्हणाली, “बऱ्याच…”

दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एल्विशवर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.

Story img Loader