Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व हळूहळू रंजक होतं चाललं आहे. पहिले काही दिवस पाहता यंदाचं ‘बिग बॉस ओटीटी’चं पर्व रटाळ असल्याच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण त्यानंतर जसे टास्क सुरू झाले तसा शो धमाकेदार होतं आहे. तिसऱ्या वीकेंडच्या वारला होस्ट अनिल कपूर यांनी स्पर्धेकांची जबरदस्त शाळा घेतली. पण पायल मलिकच्या परत येण्याने ‘बिग बॉस’च्या घरात वातावरण आणखी तापलं. कारण तिने विशाल पांडेने कृतिकाविषयी केलेल्या कमेंटचा खुलासा सगळ्यांसमोर करत त्याच्यावर गंभीर आरोप लावले. दुसरी पत्नी कृतिकाविषयी केलेली कमेंट ऐकून अरमान मलिक भडकला आणि त्यानं विशाल पांडेच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पण विशाल पांडेने कृतिकाविषयी नेमकी कमेंट काय केली? पायलने आरोप काय केले? याबाबत सविस्तर जाणून घ्या…
वीकेंडच्या वारला पायल मलिकची ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री झाली. पण ती फक्त विशालचं सत्य सगळ्यांसमोर उघड करण्यासाठी आली होती. तिने कृतिकाविषयी विशालने केलेल्या कमेंटबद्दल सगळ्यांना सांगितला आणि आरोप करत म्हणाली, “विशाल, कृतिकाकडे वाईट नजरेने पाहतो. विशालने ऑन कॅमेरा एक अशी गोष्ट बोलली आहे, जी माझ्यामते खूप वाईट, चुकीची आहे.” त्यानंतर विशाल जे काही घडलेलं ते सांगतो. विशालने लवकेश कटारियाच्या कानात “भाभी अच्छी लगती है” असं सांगितलं होतं. “त्यामागचा माझा हेतू चुकीचा नव्हता”, असं तो स्पष्ट म्हणाला. पण हे ऐकून अनिल कपूर भडकले. “जर तुझा हेतू चुकीचा नव्हता तर तू लवकेशच्या कानात का बोललास?” असा प्रश्न अनिल कपूर यांनी विशालला केला. पण या प्रश्नाचं उत्तर विशालकडे नव्हतं.
हेही वाचा – Video: अंबानीची होणारी सून राणी मुर्खजीच्या गाण्यावर जबरदस्त थिरकली, व्हिडीओ होतोय व्हायरल
पायलने वीकेंडच्या वारला केलेल्या या खुलासामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं. अरमान मलिकला विशालचा भयंकर राग आला होता. त्यामुळे याबाबत अरमान विशालशी बोलायला गेला. तेव्हा लवकेशने विशाल कृतिकाविषयी त्याच्या कानात नेमकं काय म्हणाला? हे सांगितलं. यावेळी कृतिकाविषयी केलेली कमेंट ऐकून अरमानचा पार चढला. त्याने रागाच्या भरात विशालच्या जोरात कानशिलात लगावली. त्यानंतर विशाल देखील चिडला आणि तो अरमानच्या अंगावर धावून गेला. पण घरातल्या सदस्यांनी दोघांना बाजूला केलं.
? Armaan aur Vishal ke beech hui fight which led to a rule break! ?
— JioCinema (@JioCinema) July 6, 2024
Kya honge iske consequences?
Jaanne ke liye dekhiye weekend ka vaar on #BiggBossOTT3, streaming exclusively on #JioCinema, tonight at 9pm.#VishalPandey #ArmaanMalik @loveutuber#BBOTT3onJioCinema #BBOTT3… pic.twitter.com/A9C1eO1Oav
पण आता अरमान मलिकच्या या कृत्यानंतर ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार? त्याला घराबाहेर काढणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.