बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व सध्या विविध कारणांमुळे गाजत आहे. दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. बिग बॉस ओटीटीच्या या तिसऱ्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बिग बॉसने स्पर्धकांना दिलेल्या टास्कमुळे, कधी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे, तर कधी घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे पर्व चर्चेत असल्याचे दिसते.

काय म्हणाला रणवीर शौरी?

आता अभिनेता रणवीर शौरीने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याने अरमान मलिकजवळ आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अरमान मलिकबरोबर बोलताना त्याने म्हटले, “मला बिग बॉस विजेत्याची ट्रॉफी नको आहे, मला त्याबरोबर मिळणाऱ्या रकमेची गरज आहे. २५ लाख रुपये मला मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे”, असे रणवीर शौरीने अरमान मलिकबरोबर बोलताना म्हटले आहे. दरम्यान, रणवीर शौरी नुकताच बिग बॉसच्या घराचा नवीन प्रमुख बनला असून त्याबरोबर मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा आनंद घेताना दिसत आहे. याआधीदेखील रणवीर शौरीने माझ्याकडे इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम असते तर मी बिग बॉसच्या शोमध्ये कशाला आलो असतो, असे त्याने इतर सदस्यांबरोबर संवाद साधताना म्हटले होते.

Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bigg Boss 18 rajat dalal shrutika arjun and chahat pandey is nominated
Bigg Boss 18: रजत दलालच्या चुकीमुळे ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Bigg Boss 18 Vivian Dsena Is Upset With salman khan and Kamya Panjabi
Bigg Boss 18: “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”
Bigg Boss 18 kashish Kapoor slam on Shilpa Shirodkar
Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…
Bigg Boss 18 Chahat Pandey mother challenge to bigg boss makers to find out daughter boyfriend
Bigg Boss 18: चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना दिलं खुलं आव्हान, २१ लाखांचं बक्षीस केलं जाहीर; का, कशासाठी? जाणून घ्या…
Bigg Boss 18 salman khan kamya Punjabi slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: “फक्त लूक आणि आवाजावर…”, सलमान खान-काम्या पंजाबीने विवियन डिसेनाची केली कानउघडणी, काय म्हणाले? जाणून घ्या…
Bigg Boss 18 salman khan slams chahat pandey on weekend ka vaar
Bigg Boss 18: अविनाश मिश्राला ‘स्त्रीलंपट’ म्हणण्यावरून सलमान खान भडकला, चाहत पांडेचा ‘तो’ फोटो दाखवत केली पोलखोल

हेही वाचा: “लोक मला प्लेबॉय म्हणतात, पण त्यांना…”, दोन आघाडीच्या अभिनेत्रींची फसवणूक केल्याच्या प्रतिमेवर रणबीर कपूरचे स्पष्टीकरण

दरम्यान, अभिनेत्याने बिग बॉसच्या घरात आपल्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. त्याने कोंकणा सेन शर्माबरोबरच्या घटस्फोटाविषयीदेखील वक्तव्य करत ते दोघे सहपालकत्व कसे निभावतात, हे इतरांना सांगितले होते. त्याने म्हटले होते की, “मी माझ्या घरात एकटाच असतो. माझा मुलगा हारुन हा एक आठवडा माझ्याजवळ, माझ्या घरी असतो; तर एक आठवडा त्याच्या आईजवळ असतो. मुलासाठी जेवढे त्याच्या पालकांनी जवळ असणे गरजेचे असते तितके प्रयत्न आम्ही करतो. आम्ही त्याला एक घर देऊ शकत नाही, पण गोष्टी सहज सोप्या राहतील यासाठी प्रयत्न करतो. पुढे तो म्हणतो की, घटस्फोटानंतर आजही मी आणि कोंकणा एकमेकांच्या संपर्कात असतो. मला अजूनही वाटत नाही की, मी एखाद्या नवीन नात्यासाठी तयार आहे. कारण सध्या तरी मी माझ्या कामामध्ये खूश आहे.” रणवीर शौरी आणि कोंकणा यांनी सप्टेंबर २०१० मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मार्च २०११ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी हारून असे ठेवले. मात्र, हे जोडपे २०१५ साली वेगळे झाले.

आता बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी कोणता स्पर्धक आपल्या नावावर करणार हे पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader