बॉलीवूडच्या कलाकारांची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा रंगलेली दिसते. कधी त्यांचे चित्रपट, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी त्यांचे वैयक्तिक आयुष्य यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता रणवीर शौरी सध्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. तेथे तो आपल्या खासगी आयुष्याविषयी घरातील इतर सदस्यांकडे व्यक्त होताना दिसत आहे. त्याने आपली माजी पत्नी कोंकणा सेन शर्माबरोबर पालकत्व कसे पार पडले जाते यावर वक्तव्य केले आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अरमान मलिक याच्याबरोबर बोलताना रणवीर शौरी म्हणतो, “मी माझ्या घरात एकटाच असतो. माझा मुलगा हारुन हा एक आठवडा माझ्याजवळ, माझ्या घरी असतो तर एक आठवडा त्याच्या आईजवळ असतो. मुलासाठी जेवढे त्याच्या पालकांनी जवळ असणे गरजेचे असते तितके प्रयत्न आम्ही करतो. आम्ही त्याला एक घर देऊ शकत नाही पण गोष्टी सहज, सोप्या राहतील यासाठी प्रयत्न करतो. पुढे तो म्हणतो की, घटस्फोटानंतर आजही मी आणि कोंकणा एकमेकांच्या संपर्कात असतो. मला अजूनही वाटत नाही की, मी एखाद्या नवीन नात्यासाठी तयार आहे. कारण- सध्या तरी मी माझ्या कामामध्ये खूश आहे.”
रणवीर शौरी आणि कोंकणा यांनी सप्टेंबर २०१० मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मार्च २०११ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी हारून असे ठेवले. मात्र, हे जोडपे २०१५ साली वेगळे झाले. आपल्या घटस्फोटाबद्दल तिने सोशल मीडियावर व्यक्त होताना म्हटले होते, “मी आणि रणवीरने एकमेकांच्या संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र आम्ही यापुढेदेखील एकमेकांचे चांगले मित्र राहू आणि हारूनचे सहपालकत्व निभावू.”

Jitendra Kumar remembers junior dying
“IIT मध्ये पहिल्याच दिवशी ज्युनिअरने स्वतःला संपवलं,” ‘कोटा फॅक्टरी’च्या जितेंद्र कुमारने सांगितला खऱ्या आयुष्यातला अनुभव
Jayam Ravi wife Aarti deletes all Instagram posts
ऐश्वर्या रायच्या को-स्टारच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?अभिनेत्याच्या पत्नीने डिलीट केले फोटो, १५ वर्षांपूर्वी केला प्रेमविवाह
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
Richa Chadha answered to those who trolled Deepika Padukone for wearing high heels during pregnancy
“गर्भाशय नाही तर…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढा स्पष्टच म्हणाली…

रणवीर शौरी आणि कोंकणा यांनी एकत्र काम केलेले चित्रपट

रणवीर आणि कोंकणा यांनी रजत शर्मा दिग्दर्शित ‘मिक्ड डबल्स’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला अनिल मेहता दिग्दर्शित ‘आजा नच ले’ चित्रपटातही एकत्र काम केले होते. अनंत महादेवन यांच्या ‘गौर हरी दास्तान’ चित्रपटातदेखील ते एकत्र झळकले होते. त्याबरोबरच कोंकणा सेन – शर्मा हिने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटात ‘ए डेथ इन गुंज’मध्ये देखील रणवीर अभिनय करताना दिसला होता.

रणवीर आणि कोंकणा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, कोंकणा नुकतीच अभिषेक चौबे दिग्दर्शित किलर सूप या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. लवकरच ती अनुराग बसू यांच्या मेट्रो इन दिनो या रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. रणवीर ‘टायगर ३’मध्ये शेवटचा दिसला होता. सध्या तो बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी इतर सदस्यांबरोबर शेअर करताना दिसत आहे.