Bigg Boss OTT 3: काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाला दमदार सुरुवात झाली. अनिल कपूर होस्ट करत असलेल्या या नव्या पर्वाला दोन आठवडे पूर्णही झाले नाहीत. पण आतापर्यंत तीन स्पर्धेक घराबाहेर गेले आहेत. दुसऱ्या आठवड्यात अचानक एका स्पर्धेकाला ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातून निरोप घ्यावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन दिवसांपासून ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. या टास्क दरम्यान जाहीर केलं की, पौलोमी दास, चंद्रिका दीक्षित, मुनीषा खटवानी, शिवानी कुमारी, नॅजी आणि विशाल पांडेय घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले. याच नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमधील एकजण ‘बिग बॉस ओटीटी’च्या स्पर्धेतून बाद झाला आहे.

हेही वाचा – दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये जे स्पर्धक नॉमिनेट झाले त्यामधील पौलोमी दास बेघर झाली आहे. नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना एक टास्क दिला होता. तो टास्क करून चंद्रिका दीक्षित, शिवानी कुमारी, नॅजी आणि विशाल घराबाहेर जाण्यापासून वाचले. बॉटममध्ये असलेली पौलोमी आणि मुनीषामधून एका स्पर्धकाला एलिमिनेट करण्याचा निर्णय लव्ह कटारियाला देण्यात आला होता. लव्ह कटारियाने पौलोमीचं नाव घेतलं. त्यामुळे पौलोमी आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातून बाहेर झाली आहे.

हेही वाचा – Video: नव्या घरात रुपाली भोसले खास मैत्रीण गौरी कुलकर्णीबरोबर थिरकली, ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर धरला ठेका

हेही वाचा – Video: “या मुलांना पाहून…”, ५० गरीब जोडप्यांची लग्नगाठ बांधल्यानंतर नीता अंबानींची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “एका आईला…”

दरम्यान, पहिल्या आठवड्यात ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून नीरज गोयत बाहेर झाला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात पायल मलिक बेघर झाली. तिच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. त्यानंतर आता पौलोमी एक्झिट झाली आहे. पण अशातच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होण्याची चर्चां सुरू आहे. लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री ब्रिस्टी समद्दर वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस’ घरात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott 3 second mid week elimination poulomi das eliminated from house pps