Sana Sultan Married to Mohammad Wazid In Madinah : ‘बिग बॉस ओटीटी ३’ फेम सना सुल्तान खानने निकाह केला आहे. तिने मदिनामध्ये मोहम्मद वाजिदशी निकार केला. तिने तिच्या निकाहचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सनाने अचानक चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या पतीचा चेहरा दिसत नाही. मात्र तिने पोस्टमध्ये पतीला टॅग केलं आहे. सनाच्या पतीचे नाव मोहम्मद वाजिद आहे. सनाने मदिनामध्ये पार पडलेल्या निकाहाचे फोटो शेअर केले आणि लिहिलं, “मला हे सांगताना खूप आनंद होतोय की मला सर्वात पवित्र आणि स्वप्नवत ठिकाणी – मदिनामध्ये लग्न करण्याचे सौभाग्य मिळाले. सर्वात शानदार व्यक्ती, माझे वाजिद जी. प्रेमळ मित्र ते आयुष्यभराचा जोडीदार असा आमचा प्रवास प्रेम, संयम आणि विश्वासाचा पुरावा आहे.”
सना म्हणाली की तिने या नात्याचा आदर करण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे तिला साधेपणाने लग्न करायचं होतं. कुटुंबीय आणि काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत सना व वाजिद यांनी आयुष्यातील या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
सनाच्या या पोस्टवर उमर रियाझ, देबात्मा शाह, मुनिषा खटवानी, साई केतन राव, जुबेर खान या सेलिब्रिटींनी कमेंट्स करून तिचे व तिच्या पतीचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा – घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल
सना ही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर, अभिनेत्री व मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सात मिलियन फॉलोअर्स आहेत. ती बिग बॉस ओटीटी ३ मध्ये झळकली होती.
कोण आहे मोहम्मद वाजिद?
सनाचा पती मोहम्मद वाजिदचे इन्स्टाग्राम प्रायव्हेट आहे. इन्स्टाग्राम बायोनुसार, तो झी टीव्हीमध्ये काम करतो. तो मनोरंजनविश्वात पडद्यामागे काम करतो.
© IE Online Media Services (P) Ltd