Bigg Boss OTT 3: बिग बॉस-ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. बिग बॉसचं हे तिसरं पर्व आणखी धमाकेदार आणि हटके असणार आहे. या पर्वात प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये होस्टपासून ते स्पर्धकांपर्यंत सगळंच बदलणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मे महिन्यात रीलिज होणारा हा रिअ‍ॅलिटी शो आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी कोण पेलणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात शंका होती. आणि त्या शंकेच निरसनदेखील काही दिवसांपूर्वी झालंय. या शोचा होस्ट करण जोहर किंवा सलमान खान नसून बॉलीवूडचा नायक अनिल कपूर असणार आहे.

हेही वाचा… २०१७ मध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल शाहिद कपूरच्या पत्नीला येतात अजूनही हेट कमेंट्स, मीरा राजपूत म्हणाली, “आपण चुका करतो आणि…”

बिग बॉस ओटीटी-३च्या शोमधील स्पर्धकांची नावंही आता समोर आली आहेत. अशातच आता हा शो नेमका कुठे, कधी व केव्हा पाहता येणार हे जाणून घेऊया. बिग बॉस ओटीटीचं तिसरं पर्व जिओ सिनेमावर प्रदर्शित केलं जाणार आहे. २१ जून रोजी याचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता हा शो प्रेक्षक पाहू शकतील.

बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा आनंद जर प्रेक्षकांना घ्यायचा असेल तर जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मच सबस्क्रिप्शन प्रेक्षकांना घ्याव लागणार आहे. यासाठी दरमाहा २९ रुपये प्रेक्षकांना त्यांच्या शिखातले खर्च करावे लागतील.

हेही वाचा… दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, अभिनेत्रीच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

बिग बॉसच्या या शोसाठी स्पर्धकांची नावदेखील काही प्रमाणात कन्फर्म झाली आहेत. या शोची पहिली स्पर्धक दिल्लीची वडापाव गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित आहे. याचबरोबर सोनम खान, सना मकबूल, सना सुल्तान, निखिल मेननदेखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होऊ शकतात.

हेही वाचा… आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा नव्हे तर ‘ही’ ठरली २०२४ मधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, पाहा यादी

दरम्यान, ‘बिग बॉस-ओटीटी’च्या पहिल्या सीजनचं सूत्रसंचालन करण जोहरनं केलं होतं; तर सलमान खाननं बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनचं सूत्रसंचालन केलं होतं. आता अनिल कपूर ही सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत. नव्या होस्टमुळे या शोमध्ये काय ट्वीस्ट येईल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott 3 will release soon on jio cinema know when to watch the show hosted by anil kapoor dvr