‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळेच आता सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली आहे. या शोबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बिग बॉस ओटीटी सीझन-२ सलमान खान होस्ट करणार आहे. बिग बॉस ओटीटीचे पहिले पर्व दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केले होते. मात्र, आता दुसऱ्या पर्वातून करण जोहरचा पत्ता कट करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस ओटीटी २’ यावेळी जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार असल्याने या नव्या सीझनमध्ये काहीतरी वेगळं आणि धमाकेदार पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा नवा सीझन यशस्वी करण्यासाठी पॉर्नस्टार मिया खलिफा, कॉमेडियन कुणाल कामरा, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तसेच श्रीलंकन ​​गायक योहानी यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे नुकतंच काही मीडिया रीपोर्टमधून स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर अभिजीत व सुखदा खांडकेकरचा रोमॅंटिक अंदाज; सेलिब्रिटी कपलचे फोटो व्हायरल

‘पिंकव्हीला’ आणि ‘बिग बॉस तक’च्या रीपोर्टनुसार मिया खलिफा, रज कुंद्रा यांच्याशी प्राथमिक बोलणी सुरू असल्याचं म्हंटलं जात आहे. ‘बिग बॉस ९’मधून अशाच प्रकारे पॉर्नस्टार सनी लिओनीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती आणि आज तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं असंस्थानही निर्माण केलं. त्यामुळे मिया खलिफादेखील या नव्या सीझनमध्ये दिसू शकते हे शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही.

यांच्याबरोबरच पंजाबी गायक दलेर मेहेंदी यांनाही या ‘बिग बॉस ओटीटी’साठी विचारणा झाल्याची चर्चा आहे. अद्याप या सगळ्याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा वाहिनीकडून करण्यात आलेली नाही. जसजसा या नव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर जवळ येत आहे तसतशी लोकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन-१ मध्ये ‘दिव्या अग्रवाल’ विजयी झाली होती. पहिल्या पर्वात शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद, जीशान खान, निशांत भट, प्रतीक सेहजपाल आणि नेहा भसीन यांसह एकूण १५ तगडे खेळाडू सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott season 2 makers approached porn star mia khalifa and raj kundra avn