Bigg Boss OTT Season 3 : ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. २१ जूनपासून सुरू झालेल्या या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. २ ऑगस्टला ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहेत. त्यापूर्वीच काल अरमान मलिक, लवकेश कटारिया हे दोन सदस्य स्पर्धेतून बाद झाले आहेत. त्यामुळे आता रणवीर शौरी, सना मकबुल, नेझी, कृतिका मलिक, साई केतन या टॉप पाच सदस्यातून कोण बाजी मारून ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण त्यापूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एक लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ‘गुलाबी साडी’ ( Gulabi Sadi ) फेम संजू राठोडचा ( Sanju Rathod ) परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘बिग बॉस ओटीटी’च्या ( Bigg Boss OTT ) घरात होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मीट ब्रोस, शिबानी कश्यप, निकिता, नकाश अझीझ आणि मराठमोळा गायक संजू राठोडचा परफॉर्मन्स होणार आहे. यावेळी संजू राठोड त्याची सुपरहिट झालेली मराठी गाणी परफॉर्म करणार आहे. ‘गुलाबी साडी’, ‘नऊवारी पाहिजे’, अशा मराठी गाण्यांवर ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातील ( Bigg Boss OTT ) टॉप पाच स्पर्धक थिरकताना दिसणार आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत.
हेही वाचा – Video: दारुच्या नशेत प्रसिद्ध गायकाचा टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये हंगामा, व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, याआधी संजू राठोडचा मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात जलवा पाहायला मिळाला होता. अनंत अंबानीच्या वरातीत संजू राठोडने ‘गुलाबी साडी’ गाणं परफॉर्म केलं होतं. या गाण्यावर वरातीत असलेल्या बॉलीवूड सेलिब्रिटींसह सर्वजण जबरदस्त थिरकरताना पाहायला मिळाले होते.
हेही वाचा – Bigg Boss Marathi : नॉमिनेशवरून योगिता चव्हाण अन् जान्हवी किल्लेकरमध्ये पडली वादाची ठिणगी, पाहा प्रोमो
‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात एकूण किती सदस्य होते?
‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात ( Bigg Boss OTT ) १४ ते १५ सदस्य होते. सना मकबूल, पौलोमी दास, विशाल पांडे, सना सुलतान, चंद्रिका दीक्षित, दीपक चौरसिया, साई केतक राव, नीरज गोयत, शिवानी कुमारी, लव कटारिया, नेझी, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी सदस्यांचा सहभाग होता. पण आता यामधील पाच सदस्य अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकले आहेत.