Bigg Boss OTT 3: गेल्या काही महिन्यांपासून ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व येणार की नाही अशी चर्चा सुरू होती. एवढंच नव्हे तर यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द झाल्याचं वृत्त आलं होतं. ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू केलं तर त्यानंतर लगेच ‘बिग बॉस’चा १८वं पर्व सुरू होईल. दोन्ही शोमध्ये फारसे अंतर राहणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येऊ शकतो. या कारणामुळे यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं रद्द करून पुढे ढलकण्याचा निर्णय घेतला जात होता. पण तसं काहीही झालं नाहीये. २१ जूनपासून ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पण यात एक मोठा बदल झाला आहे. यंदाचं ओटीटीचं पर्व अभिनेता सलमान खान नव्हे तर अभिनेते अनिल कपूर होस्ट करणार आहेत. नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला असून यामध्ये अनिल कपूर यांची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जिओ सिनेमा’च्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “मौसम बदलेगा, तापमान बदलेगा. एक के आने से, अब सब बदलेगा,” असं कॅप्शन देत नवा प्रोमो शेअर करण्यात केला आहे. या प्रोमोमधून सलमान खान ऐवजी अनिल कपूर हेच यंदाचं पर्व होस्ट करणार हे स्पष्ट झालं आहे. प्रोमोमध्ये अनिल कपूर यांची जबरदस्त एन्ट्री होताना दिसत आहे.

हेही वाचा – “पुनर्जन्म आहे का?”, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ फेम अभिनेता आजीच्या आठवणीत झाला भावुक, म्हणाला, “पुन्हा ये…”

‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाच्या या नव्या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सलमान खानचं होस्ट पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सलमान खान नाही तर बिग बॉस नाही”, “आम्हाला सलमान खान पाहिजे”, “सलमान खानचं सर्वात्कृष्ट होस्ट आहे”, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत. तर काहींनी अनिल कपूर यांच्या समर्थात प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अनिल कपूर सर्वोत्कृष्ट होस्ट आहेत”, “अनिल सर झकास”, “करण जोहरपेक्षा तरी अनिल कपूर बेस्ट आहेत”, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘शिवा’प्रमाणेच श्रुती मराठेच्या ‘भूमिकन्या’ नव्या मालिकेच्या पहिल्या भागाचं प्रेक्षपण रखडलं, प्रेक्षकांची मागितली माफी

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व २१ जूनपासून रात्री ९ वाजता ‘जिओ सिनेमा’वर पाहता येणार आहे. मागील दोन पर्व जिओ सिनेमावर मोफत होते. पण आता ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott season 3 new promo out with host anil kapoor pps