‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सीजनची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. प्रेक्षक या सीजनची आतुरतेनं वाट पाहतायत. काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’बद्दल नवनवीन अपडेट्स समोर येत होते. या सीजनचा नेमका होस्ट कोण असणार याबद्दलदेखील प्रेक्षकांच्या मनात शंका होती. परंतु, आता सगळ्यांच्याच शंकेचं निरसन झालं आहे. कारण- बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीजनच्या नव्या होस्टचं नाव जाहीर झालंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण जोहर व सलमान खाननंतर आता नव्या होस्टची घोषणा वाहिनीतर्फे करण्यात आली आहे. जिओ सिनेमाने नुकताच नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री दाखवली आहे. अनिल कपूर येताच त्यांच्या स्टाईलमध्ये ते एक शिट्टी वाजवतात आणि म्हणतात, “खुर्सी मंगा रे, ए बोहोत हो गया रे झकास, करते है ना कुछ खास”

हेही वाचा… ठरलं तर मग: व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार सुरू अन् मिळणार साक्षीविरोधात नवा पुरावा; चैतन्य खेळणार नवी खेळी, पाहा प्रोमो

या प्रोमोला कॅप्शन देत जिओ सिनेमानं लिहिलंय, “बिग बॉस ओटीटीच्या नवीन सीजनसाठी नवीन होस्ट आणि बिग बॉससारखाच त्यांचा आवाजच पुरेसा आहे. हे ओळखणाऱ्याला काही बक्षीस वगैरे नाही आहे.”

बिग बॉसच्या पहिल्या सीजनचं सूत्रसंचालन करण जोहरनं केलं होतं; तर सलमान खाननं बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनचं सूत्रसंचालन केलं होतं. जिओ सिनेमानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “बिग बॉसचा नायक.” अनेक जण अनिल कपूर यांना सूत्रसंचालन करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता निर्मात्यांनी पुष्टी केली आहे की, यावेळी अनिल कपूर हा शो होस्ट करणार आहे; परंतु एप्रिलमध्ये याबद्दल साशंकता होती.

हेही वाचा… अर्जुन कपूरशी ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन; म्हणाली, “नाही, या सगळ्या…”

एप्रिलमध्ये प्रॉडक्शन हाऊस एन्डेमोल शाइन इंडियाने बिग बॉस ओटीटीच्या सीजन-३ ची घोषणा त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर केली होती. प्रॉडक्शन हाऊसनं एक पोस्टर शेअर केलं होतं; ज्यामध्ये अनिल कपूर नव्हे, तर सलमान खान प्रेक्षकांकडे बोट दाखविताना दिसला होता आणि त्याला कॅप्शन दिलं होतं, ‘तुम्हाला बिग बॉस ओटीटीमध्ये कोणाला बघायचं आहे.’ मात्र, नंतर ती पोस्ट हटविण्यात आली.

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला पडली ‘हीरामंडी’च्या गाण्याची भुरळ; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “महाराष्ट्राची क्रश…”

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott season 3 will be hosted by anil kapoor dvr