मे महिन्याचा शेवटचा आठवडा चित्रपट व सीरिजच्या चाहत्यांसाठी खूप उत्तम राहिला. कारण या आठवड्यात बहुप्रतिक्षीत ‘पंचायत ३’ सीरिज रिलीज झाली. प्रदर्शनाच्या एका आठवड्यानंतरही याच सीरिजची ओटीटी जगतात चर्चा आहे. आता या आठवड्यात ओटीटीवर नवीन काय पाहता येणार, याबाबत तुम्ही उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या आठवड्यात क्राईम-थ्रिलरपासून ड्रामा आणि कॉमेडीपर्यंत सर्व काही ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि सीरिजची यादी पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुनाह

जर तुम्हाला क्राइम थ्रिलर शो पाहायला आवडत असतील तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘गुनाह’ पाहू शकता. यामध्ये गश्मीर महाजनी व सुरभी ज्योती आणि इबाद खान यांच्या भूमिका आहेत. मराठमोळ्या गश्मीर महाजनीने वर्षभरानंतर कमबॅक केलं आहे. या सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे.

द लिजेंड ऑफ हनुमान

द लिजेंड ऑफ हनुमानच्या चौथ्या सीझनची कथा भगवान हनुमानांभोवती फिरते. रामाची सेवा करण्यासाठी महादेव हनुमानाच्या अवतारात कसा जन्म घेतात हे दाखवले आहे. हा शो तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

स्मिता पाटील यांच्या कांजीवरम साड्यांपासून बनवलेला ड्रेस घालून लेक प्रतीक पोहोचला Cannes मध्ये, पाहा खास Photos

ब्लॅकआउट

ब्लॅकआउट सिनेमा एका क्राईम रिपोर्टरभोवती फिरतो. हा रिपोर्टर लोभ आणि खोटेपणाच्या जगात अडकतो. या सीरिजमध्ये विक्रांत मॅसी, मौनी रॉय आणि सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज तुम्हाला जिओ सिनेमावर पाहता येईल.

बडे मियाँ छोटे मियाँ

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ६ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध असेल, याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा आणि रोनित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास ६५ कोटी रुपये होते.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

गुल्लक ४

गुलक ४ ची गोष्ट एका छोट्या शहरात राहणाऱ्या मिश्रा कुटुंबाची आहे. हे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. यात जमील खान, हर्ष मायार, गीतांजली कुलकर्णी आणि वैभव राज गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुम्ही ही सीरिज ७ जूनपासून सोनी लिव्हवर पाहू शकता.

हिट मॅन

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात एक प्राध्यापक अंडरकव्हर पोलीस स्टिंगच्या रुपात बनावट हिटमॅन बनतो. ही सीरिज तुम्हाला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

हायरारकी

हायरारकी ही कोरियन वेब सीरिज आहे. हे एका शाळेच्या कथेवर आधारित या वेब सीरिजमध्ये किशोरवयीन विद्यार्थी प्रेमात पडतात आणि कथा हळूहळू वळण घेते. तुम्ही ही सीरिज ७ जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blackout gunaah gullak 4 hitman movies and web series releasing on ott this week hrc