दाक्षिणात्य चित्रपटांची फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात क्रेझ पाहायला मिळते. थलपती विजय, यश, प्रभास, कमल हासन, अजित, रजनीकांत यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करतात. या स्टार्सचे चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवरच चांगलं कलेक्शन करतात असं नाही, तर त्यांचे डिजीटल अधिकार विकत घेण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सना कोट्यवधी रुपये मोजावे लागतात.

एकीकडे बॉलीवूडमध्ये खूप कमी चित्रपट हिट होत आहेत, तर दुसरीकडे दक्षिणेतील निर्माते चित्रपटांवर प्रचंड पैसा खर्च करून दुप्पट कमाई करत आहेत. पण त्यांची कमाई फक्त सिनेमागृहांपुरती मर्यादित नाही. थिएटर्समध्ये तुफान कमाई करून झाल्यावर ते ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूप पैसे आकारतात. आज आम्ही तुम्हाला अशा सहा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी बॉक्स ऑफिस तर गाजवलंच पण ओटीटी रिलीजसाठी प्रचंड पैसे घेतले.

Shahid Kapoor starr Deva box office collection day 2
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला 
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
Deva Advance Booking Day 1
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू; पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?

अखेर २५ दिवसांनी परतला बेपत्ता गुरुचरण सिंग, नेमका कुठे गेला होता? त्यानेच पोलिसांना दिली माहिती

लिओ

थलपती विजयची मुख्य भूमिका असलेल्या ‘लिओ’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटाचा सस्पेन्स आणि कथेची तुलना ‘दृश्यम’ शी झाली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ६५० कोटी रुपये कमावले, तर त्याचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने तब्बल १२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या तामिळ चित्रपटासाठी ही सर्वात महाग ओटीटी डील आहे.

वीकेंडसाठी नेटफ्लिक्सवरील सर्वोत्तम ॲक्शन-थ्रिलर चित्रपट अन् वेब सीरिजची यादी; तुम्ही पाहिल्या आहेत का ‘या’ कलाकृती?

जेलर

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची निर्मिती नेल्सन दिलीपकुमार यांनी केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींहून अधिक कमाई केली. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने १०० कोटी रुपये देऊन ‘जेलर’चे डिजिटल अधिकार विकत घेतले.

पोन्नियन सेल्वन

मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियन सेल्वन या चित्रपटाच्या दोन्ही भागांची खूप चर्चा झाली. करोनामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पोन्नियन सेल्वनचे दोन्ही भाग १२५ कोटी रुपयांना विकले गेले.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, शुक्रवारी OTT वर होणार मनोरंजनचा धमाका; वाचा कलाकृतींची संपूर्ण यादी

वारिसु

वारिसू हा थलपती विजयचाच चित्रपट आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्राइम व्हिडीओने या चित्रपटाच्या डिजीटल अधिकारांसाठी ८० कोटी रुपये मोजले.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

थिनुवू

अभिनेता अजितच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. थिएटरनंतर ‘थिनुवू’ ओटीटीवरही प्रदर्शित झाला. ओटीटीवरही चाहत्यांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजितच्या या चित्रपटाचे अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत. नेटफ्लिक्सने ते ६५ कोटींना विकत घेतले.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

गुडाचारी २

आदिवी शेषची मुख्य भूमिका असलेला ‘गुडाचारी २’ हा गुप्तहेरावर आधारित चित्रपट आहे. चित्रपटात सैनिक भारताबाहेर राहून आपल्या देशासाठी लढतो. ७० ते ८० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटासाठी डिजीटल डील १५० कोटींमध्ये झाल्याचं म्हटलं जातंय.

Story img Loader