बॉलीवूडची बेबो म्हणजे करीना कपूर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी येत आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा जलावा दाखवल्यानंतर आता करीना ओटीटीवर पदार्पण करत आहे. ‘जाने जा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओटीटी क्षेत्रात पाऊल ठेवतं आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून थ्रिलर आणि सस्पेन्समुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – व्याख्यानं फुकट देण्याच्या मागणीवर अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “मी मेलो तरी…”

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली

करीना कपूरचा ‘जाने जा’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा पाहायला मिळणार आहे. ‘जाने जा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केलं आहे. नेटफ्लिक्सनं आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला असून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

हेही वाचा – “तुझी स्टाईल अन् बोलणं ‘ढोलकीच्या तालावर’ या मंचाला शोभणार नाही असं म्हणाले होते तेव्हा…”; अक्षय केळकरनं सांगितला ‘तो’ किस्सा

जपानी लेखक केइगो हिगाशिनो (keigo higashino) यांची सर्वाधिक विकलेली थ्रिलर कादंबरी ‘डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ (The Devotion of Suspect X) यावर ‘जाने जा’ चित्रपट आधारित आहे. २१ सप्टेंबरला करीनाचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी करीनाचा जन्मदिवसही आहे. या चित्रपटातून करीना एक वेगळ्या रुपातून पाहायला मिळणार आहे. यामध्ये तिनं आईची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला चाहत्यांकडून पाहिजेत ‘हे’ गिफ्ट्स; म्हणाली, “मुंबईत एक घर अन्…”

दरम्यान, करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, शेवटची ती ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता तिचे यंदा दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एक म्हणजे ‘जाने जा’ आणि दुसरा ‘The Buckingham Murders’. याशिवाय ‘द क्रू’ चित्रपटातही करीना झळकणार आहे. हा चित्रपट २०२४ प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader