सध्या ओटीटी हा एक उत्तम पर्याय असला तरी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहाचे मालक यांच्यासाठी तो एक शापच आहे. सध्या बॉलिवूडचे चित्रपट थिएटरच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मसुद्धा घ्यायला तयार नाहीत त्यामुळे याचा फटका बॉलिवूडला बसला आहे. ही एक बाजू असली तरी ओटीटीमुळे कित्येक कलाकारांना खरी ओळख मिळाली आहे. नुकतीच प्राइम व्हिडिओवर ‘फोर मोअर शॉट्स’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेबसीरिजवर टीका झाली तर काही लोकांनी प्रचंड कौतुक केलं. या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारी कीर्ती कुल्हारी हिने ओटीटी विश्वाबद्दल स्टेटमेंट केलं आहे. कीर्तीला या वेबसीरिजमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली पण आता ओटीटीपासून लांब राहायचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : आलिया भट्टनेही केली दिवाळी साजरी; सासरी जाऊन केलं थाटात लक्ष्मीपूजन

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कीर्ती म्हणाली, “मला आता काहीतरी असं काम करायचं आहे ज्यातून मला खूप प्रेरणा मिळेल. ओटीटीवर मला चांगली संधी मिळाली आणि त्याचा मला खूप फायदाही झाला. पण यावर्षी मी मुद्दाम ओटीटीपासून थोडी अलिप्त राहायचं ठरवलं आहे. मला आता चित्रपटावर लक्षकेंद्रित करायचं आहे, म्हणून मी ओटीटीपासून जरावेळ ब्रेक घेत आहे.”

२०१० साली ‘खिचडी’ या चित्रपटातून कीर्तीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘पिंक’, ‘ब्लॅकमेल, ‘उरी’ अशा वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आणि तिच्या कामाचं प्रेक्षकांनी चांगलंच कौतुक केलं. कीर्ती ही प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे आणि हे तिने वारंवार तिच्या कामातून सिद्ध केलं आहे. आता कीर्ती अभिनयाबरोबरच निर्मितीक्षेत्रातही उतरत आहे. ती स्वतः एका चित्रपटाची निर्मिती करत असून त्यात मुख्य भूमिकाही साकारणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kirti kulhari wanted to take break from ott to concentrate on film career avn