अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या सिरीजबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन ही तृतीयपंथीयांच्या वेशात दिसत आहे. यात सुश्मिता सेनने गौरी सावंत हे पात्र साकारलं आहे. नुकतंच अभिनेत्री सायली संजीवने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ताली ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. अभिनेत्री सायली संजीवने नुकतंच इन्स्टाग्रामवर या वेबसीरिजबद्दल एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिला ही सीरिज कशी वाटली, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

“टाळी, तर वाजवायला हवी… तुम्ही सर्वांसाठी. ‘ताली’ तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन. क्षितीज पटवर्धन, रवी जाधव, सुश्मिता सेन, कृतिका देव तुम्हा सर्वांसाठी टाळ्या”, असे सायली संजीवने म्हटले आहे.

sayali sanjeev
सायली संजीव

आणखी वाचा : Video : “ही कायम सोबत ठेव…”, ‘ताली’मधील सुश्मिता सेनच्या गळ्यातील ‘त्या’ रुद्राक्षाच्या माळेची खासियत, रवी जाधव यांचा खुलासा

दरम्यान ‘ताली’ ही वेबसीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली. या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

Story img Loader