अभिनेत्री सुश्मिता सेन ही कायमच चर्चेत असते. सुश्मिता सेनची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ताली ही वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सुश्मिता सेनने या वेबसीरिजमध्ये तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या गौरी सावंत याची भूमिका साकारली आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सुश्मिताने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

सुश्मिता सेनने नुकतंच कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या लाईफस्टाईलबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिला “तू सकाळी किती वाजता उठतेस”, असे विचारण्यात आले.
आणखी वाचा : “मला नवरा हवाय, पण माझ्या दोन्हीही मुलींना…”, वयाची ४५ शी ओलांडलेल्या सुश्मिता सेनने केला लग्नाबद्दल खुलासा, म्हणाली “माझे वडील…”

त्यावर ती म्हणाली, “मी रात्री किती वाजता झोपते, यावर मी सकाळी किती वाजता उठते हे अवलंबून असतं.” त्यानंतर सुश्मिताला “तुला सकाळी लवकर उठणं की रात्रभर जागं राहणं पसंत आहे”, असे विचारण्यात आले. त्यावर तिने “मला रात्रभर जागं राहायला आवडतं”, असं म्हटले.

आणखी वाचा : “तुझा पहिला पगार किती रुपये होता?” सुश्मिता सेन म्हणाली…

दरम्यान सुश्मिता सेन अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. ती कायमच तिच्या उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करत असते. ती फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते. ती फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी योगा, नियमित व्यायाम अशा अनेक गोष्टी करताना दिसते.

Story img Loader