२०२२ हे वर्षं अभिनेत्री तापसी पन्नूसाठी काही खास ठरलं नव्हतं. तिचे सलग ३ ते ४ चित्रपट एकापाठोपाठ एक आपटले. ‘दोबारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला, तर ओटीटीवर प्रदर्शित झालेले ‘लुप लपेटा’, ‘ब्लर’ हे चित्रपटही काहीच कमाल दाखवू शकले नाहीत, पण आता हे नवं वर्षं तापसीसाठी लाभदायक ठरू शकतं.
२०२१ साली तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अगदी हीट ठरला नसला तरी बऱ्याच लोकांना याची कथा चांगलीच आवडली होती. सस्पेन्स आणि रोमान्सचा तडका असलेल्या या चित्रपटाचा आता पुढचा भाग ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा : भारतातील सर्वोत्तम वेबसीरिज ‘असुर’चा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…
नुकतंच तापसीच्या या नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून यात ती अत्यंत बोल्ड अवतारात तिला सादर केलं गेलं आहे. लाल रंगाची साडी आणि बॅकलेस ब्लाऊज परिधान करून तापसी पाठमोरी ताज महालसमोर बसली आहे. याबरोबरच तिच्या हाताची बोटं रक्ताने माखली आहेत. तापसी हा पोस्टरवरचा थरकाप उडवणारा पण भुरळ पाडणारा हा बोल्ड लूक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे.
‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसीबरोबर हर्षवर्धन राणे आणि विक्रांत मॅसे हे प्रमुख भूमिकांमध्ये होते. आता या नवीन भागात तापसीबरोबर विक्रांत आणि सनी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय आनंद एल राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.