राजकीय व्यक्तींवर बायोपिक बनवण्याची लाट आली आहे. हिंदीतच नव्हे तर मराठीतदेखील ‘धर्मवीर’ होऊन गेले आहेत. बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना गेले काही महिने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आत बॉलिवूडची आणखीन एकअभिनेत्री इंदिरा गांधींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

‘डर्टी पिक्चर’, ‘परिणीता’, ‘लगे रहो मुंन्नाभाई’ धाटणीचे चित्रपट देणारी अभिनेत्री विद्या बालन आता इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. विद्याने काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींवर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तब्बल तिची आता ही इच्छा पूर्ण होणार आहे. इटाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार विद्या बालन आता वेबसीरिजच्या माध्यमातून ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर या वेबसीरिजची निर्मिती करणार आहे.

Marathi Actress Deepali Sayed new hotel
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक राजकीय मान्यवरांनी दिली भेट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
cm devendra fadnavis loksatta news
आमच्या कुटुंबात ‘तिच’ सर्वाधिक प्रगल्भ, फडणवीस कोणाबाबत बोलले?
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?

भाऊ वहिनीच्या वादात सुश्मिता सेनने भाचीबरोबरचा फोटो केला शेअर; म्हणाली “आमच्या आयुष्यात…”

पत्रकार सागरिका घोष इंदिरा गांधींच्या पुस्तकावर ही वेब सीरिज बनवली जाणार आहे. विद्याने आजवर भूमिका साकारल्या आहेत. ‘डर्टी पिक्च’र हा तिचा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेला होता. विद्याने चित्रपटांच्या बरोबरीने ओटीटी विश्वातदेखील काम केले आहे. जलसा या वेबसीरिजमध्ये तिने काम केले होते.

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्रींनी इंदिरा गांधी यांची भूमिका केली आहे. लारा दत्ता, नवनी परिहार, अवंतिका अकेरकर तसेच मराठी अभिनेत्री सुप्रिया विनोद, किशोरी शहाणे यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका केली आहे. विद्या बालन आता इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याने तिचे चाहतेदेखील आता उत्सुक आहेत.

Story img Loader