बॉलिवूडमध्ये आजवर प्रेमाचे त्रिकोण दाखवले गेले आहेत. आता हाच फॉर्मुला एका नव्या रूपात आपल्यासमोर येणार आहे. अभिनेता विकी कौशल, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर यांचा ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आजचे आघाडीचे कलाकार दिसत आहेत. या चित्रपटाची गेली अनेकदिवसांपासून चर्चा सुरु होती आणि अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरवात थोडी विनोदी पद्धतीने होते मात्र नंतर चित्रपटाचा ट्रेलर गंभीर बनत जातो. ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या काही विनोदी प्रसंग दाखवले आहेत. भूमी पेडणेकर यात विकी कौशल्याच्या पत्नीच्या भूमिकेत दाखवली आहे तर विकी दुसरीकडे कियाराबरोबर रोमान्स करताना दिसून आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तरी असं दिसत आहे हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असेल. सयाजी शिंदे यांची झलक यात पाहायला मिळते.

हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार पर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे. पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र काम करताना दिसत आहेत. या ट्रेलरमुळे साहजिकच त्यांचे चाहते चित्रपट बघण्यास उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood film govinda naam mera trailer vicky kaushal kiara advani bhumi pednekar movie released on ott spg