Movies Based On Kashmir : काश्मीर म्हणजे भारताला लाभलेलं स्वर्ग. इथल्या बर्फाच्छादित हिमालयाच्या रांगा, काश्मीर खोरं, झेलम नदी अशा अनेक नयनरम्य गोष्टी आहेत. नयनरम्य गोष्टी म्हटलं की, त्या गोष्टी बॉलीवूडच्या सिनेमात येणारच. शम्मी कपूर यांच्या ‘काश्मीर की कली’, यशराज चोप्रा दिग्दर्शित ‘कभी कभी’ अशा अनेक सिनेमांची शूटिंग्स काश्मीरमध्ये झाली आहेत. मात्र, १९८० च्या उत्तरार्धात काश्मिरात फोफावलेल्या दहशतवादामुळे काश्मिरात सिनेमांचं होणारं शूटिंग्स बंद झालं. कालांतराने याच प्रदेशात घडलेल्या अनेक घटनांवर सिनेमे आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणूक सुरू असून, कलम ३७० रद्द केल्यानंतर इथे पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक होत आहे. १९८० नंतर काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित अनेक बॉलीवूड सिनेमे तयार झाले आहेत. काश्मिरी पंडित, दहशतवाद आणि कलम ३७० यांसारख्या विषयांवर हे सिनेमे आधारित आहेत. ओटीटी माध्यमावर उपलब्ध असलेल्या या सिनेमांतून काश्मीर प्रश्न आणि तेथील प्रमुख घटनांची माहिती मिळते.
हेही वाचा…एकाच दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित झाले चित्रपट, दोन्ही ठरले फ्लॉप; आता एकाच दिवशी ओटीटीवर येणार?
मिशन काश्मीर
‘मिशन काश्मीर’ २००० साली आलेला सिनेमा काश्मीरमधील दहशतवाद आणि सैनिकी कारवाया यामुळे पीडित मुलाची कथा सांगतो. या सिनेमात हृतिक रोशन, संजय दत्त, सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आई-वडील गमावलेल्या मुलाचा भारतीय सैनिकांवर असलेला राग आणि त्याच्या मनातील द्वंद्व सिनेमात प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर उपलब्ध आहे.
काश्मीर फाईल्स
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘काश्मीर फाईल्स'(२०२२) हा सिनेमा काश्मिरी पंडितांच्या वेदनांवर आधारित आहे. १९८० च्या उत्तरार्धात काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरांमधून पलायन करावं लागलं. त्यांच्या हत्या आणि दहशतवाद सिनेमात दाखवण्यात आले आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची कथा एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याभोवती फिरते, जो काश्मीरमधील आपल्या कुटुंबाची माहिती जाणून घेत असताना काश्मिरी पंडित आणि त्यांच्या झालेल्या हत्या या इतिहासात आपल्याला घेऊन जातो. हा सिनेमा ‘झी ५’ वर उपलब्ध आहे.
हेही वाचा…Stree 2 OTT Release: श्रद्धा कपूरचा ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ ओटीटीवर दाखल, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
शिकारा
‘शिकारा’ (२०२०) हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर भाष्य करतो. यात एक प्रेमकथा आहे, जी काश्मीरच्या सौंदर्याला आणि तिथल्या काश्मिरी पंडित समाजाचं विस्थापन दाखवते. काश्मिरी पंडित जोडप्याला अनेक वर्ष शरणार्थी छावणीत (रेफ्युजी कॅम्पमध्ये) राहावं लागतं, त्यांचं प्रेम आणि त्यांचं दुःख यांचं प्रभावी चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. सिनेमात काश्मीरचे सौंदर्य दाखवणारी दृश्ये कवितेतून मांडली आहेत. हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर उपलब्ध आहे.
हेही वाचा…करीना कपूर खानचे गाजलेले ‘हे’ क्राइम-थ्रिलर चित्रपट तुम्ही पाहिलेत का? OTT वर आहेत उपलब्ध
आर्टिकल ३७०
काश्मीर राज्याला स्वतःची राज्यघटना होती. त्याला भारताचे काही कायदे वगळता इतर कायदे लागू नव्हते. अशी तरतूद असणारे कलम ३७० हे २०१९ मध्ये रद्द करण्यात आले. याच घटनेवर हा ‘आर्टिकल ३७०’ (२०२४) सिनेमा आधारित आहे. हे कलम असताना काश्मीरची स्थिती ते कलम काढण्यादरम्यानच्या सरकारी हालचाली, तेव्हाची परिस्थिती यावर हा चित्रपट भाष्य करतो. यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘जिओ सिनेमा’वर उपलब्ध आहे.