मलायका अरोराच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या वेब शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा एक टॉक शो आहे आणि यात बरंच बॉलिवूड गॉसिप आपल्याला ऐकायला मिळणार आहे. नुकताच या शोचा पहिला एपिसोड ‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या पहिल्या भागात कोरिओग्राफर दिग्दर्शिका फराह खान हिने हजेरी लावली आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.
या शोमधून मलायकाच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. सोशल मीडियावर या शोला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. हा कार्यक्रम म्हणजे बॉलिवूडची प्रतिमा सुधारण्याचा एक प्रयत्न वाटत असल्याचं मत बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर मांडलं आहे. यावरून बरेच मीम्सदेखील व्हायरल होत आहेत. बॉलिवूडकर मात्र या शोची खूप प्रशंसा करताना दिसत आहे.
आणखी वाचा : KBC 14 : “गंभीर सीनच्यावेळी काजोल…” बिग बींनी सांगितला ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा
मलायका अरोराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या मित्र मैत्रिणींनी टाकलेल्या पोस्ट शेअर केल्या आहेत.बॉलिवूडकरांना हा शो भलताच आवडला आहे. मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाण्याआधी मलायकाने एक स्टोरी पोस्ट केली, त्यात करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी हा शो बघण्यात अगदी गर्क असल्याचं स्पष्ट होत आहे. हा फोटो शेअर करताना मलायका म्हणते, “माझ्या मुली एका जागी बसून माझा शो पाहत आहेत.”
मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने टाकलेली पोस्टही मलायकाने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने हा शो बघतानाचा फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिलं की, “मला माहीत आहे मी काय बघतोय. मलायका मला तुझा अभिमान वाटतो. पहिला भाग पूर्ण झाला आहे, पुढील भागांसाठी प्रचंड उत्सुक आहे.” करिश्मा कपूरनेसुद्धा अशीच पोस्ट करत मलायकाचं कौतुक केलं आहे. एकीकडे नेटकरी या शोला ट्रोल करत असताना बॉलिवूडची मंडळी मात्र याचं प्रचंड कौतुक करत आहेत.