रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात मोठी कमाई केली आहे. हे आकडे धक्कादायक आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून अयान मुखर्जीच्या चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकला जात होता. असे असूनही प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद पाहून निर्माते आनंदात आहेत. आता त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे, कारण ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी मोठ्या रक्कमेत चित्रपटाचे हक्क विकले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच, हा चित्रपट लवकरच ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. याआधी आणि आताही ट्विटरवर चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. असे असूनही या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात ७५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही ८५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली असण्याची शक्यता आहे. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत असतानाच त्याचे हक्क ओटीटीवर मोठ्या किंमतीत विकले गेले आहेत.
आणखी वाचा-Brahmastra Box Office Collection day 3 : ‘ब्रह्मास्त्र’ने जमवला १२५ कोटींचा गल्ला; रणबीर कपूरसाठी ठरला बिग ओपनर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ चे हक्क डिस्ने प्लस हॉटस्टारने विकत घेतले आहेत, कारण डिस्ने प्लस हॉटस्टार पहिल्या दिवसापासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भागीदार आहे. अशा परिस्थितीत या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे की धर्मा फिल्म्सचा अॅमेझॉनशी करार झाला आहे. त्यामुळे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला चित्रपटाचे हक्क मिळाले असून या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, या दोघांपैकी कोणीच अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

आणखी वाचा-‘ब्रह्मास्त्र’ मधला किंग खानचा लूक व्हायरल, चाहते म्हणाले, “२० मिनिटांच्या भूमिकेत शाहरुखने.. “

दरम्यान निर्मात्यांना ‘ब्रह्मास्त्र’ ओटीटीवर लवकर प्रदर्शित करायचा नाही असेही बोललं जात आहे. यामागचे कारण म्हणजे चित्रपटातील व्हीएफएक्स जबरदस्त आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याची खरी मजा फक्त चित्रपटगृहात येईल. तेही थ्रीडीमध्ये. याशिवाय असेही बोलले जात आहे की जर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर लवकर रिलीज केला तर नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा चित्रपट रिलीजच्या ६ आठवड्यांनंतरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmastra ott release know about when and which ott platform it will release mrj