सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटासाठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे, पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की, धर्मांतर, ब्रेनवॉश, ISIS मध्ये होणारी महिलांची भरती या प्रकरणावर ‘द केरला स्टोरी’आधी एका वेबसीरिजमधून भाष्य करण्यात आले होते.

आणखी वाचा : Viral Video : समांथा रूथ प्रभूने का परिधान केला बुरखा? व्हायरल व्हिडीओमागील कारण जाणून घ्या

२०२० साली प्रदर्शित झालेली स्विडिश वेबसीरिज ‘कॅलीफेट’ हीसुद्धा याच विषयावर बेतलेली आहे. या वेबसीरिजची कथा ‘बेथनल ग्रीन ट्रायो’ या केसवर आधारित आहे. ‘द केरला स्टोरी’ आणि ‘कॅलीफेट’ या वेबसीरिजमध्ये बरेच साम्य तुम्हाला बघायला मिळेल. दहशतवाद्यांची क्रूरता, तसेच कॉलेजवयीन तरुणींचे ब्रेनवॉश, हे या दोन्ही कलाकृतींत आपल्याला बघायला मिळते.

‘द केरला स्टोरी’प्रमाणेच ‘कॅलीफेट’ ही वेबसीरिजही तीन मुलींच्या सत्यघटनेवर बेतलेली आहे. लंडनच्या बेथनल कॉलेजमधील अमायरा, शमीमा आणि कदिजा या तीन ब्रिटिश मुली २०१५ मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये दाखल झाल्या. ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक डायलॉग’ने दावा केला आहे की पाश्चात्त्य देशांतील सुमारे ५५० महिला आणि मुली आयसीसमध्ये सामील झाल्या आहेत.

या प्रकरणावर बेतलेल्या वेबसीरिजची चांगलीच चर्चा झाली. आता ‘द केरला स्टोरी’मुळे पुन्हा या सीरिजबद्दल बोलले जात आहे. सहा भागांची ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caliphate is the swedish webseries which is very similar to the kerala story avn
Show comments