Movies on OTT in September : ऑगस्टमध्ये मनोरंजनचा धमाका झाल्याचं पाहायला मिळालं. ‘स्त्री २’, ‘वेदा’, ‘खेल खेल में’ हे चित्रपट थिएटर्समध्ये आले, तर ‘कल्कि 2898 एडी’, ‘चंदू चॅम्पियन’, ‘मुंज्या’सारखे चित्रपट ओटीटी व टीव्हीवर आले. ऑगस्टमध्ये हिंदीसह प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक सिनेमे ओटीटीवरही रिलीज झाले होते. त्यानंतर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही चित्रपट व वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला घरबसल्या या सर्व कलाकृती पाहता येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सप्टेंबर महिन्यात काही गाजलेल्या सीरिजचे आगामी भाग येणार आहेत. तर काही नवीन सीरिज व चित्रपट येतील. या यादीत अनन्या पांडेचा चित्रपट ‘कॉल मी बे’ पासून ते ‘एमिली इन पॅरिस’चा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात कोणते चित्रपट व सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील ते जाणून घ्या.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

‘कॉल मी बे’

अनन्या पांडे, वीर दासच्या या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजचा पहिला एपिसोड ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित ही सीरिज तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकाल.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

‘तनाव २’

‘तनाव’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लोकप्रिय वेब सीरिज ‘तनाव’चा पहिला सीझन प्रेक्षकांना फार आवडला होता, त्यानंतर आता दुसरा सीझन ६ सप्टेंबरपासून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

‘सेक्टर 36’

विक्रांत मॅस्सी व दीपक डोब्रियाल यांचा चित्रपट ‘सेक्टर 36’ एक क्राइम थ्रिलर आहे. हा चित्रपट दिल्लीतील एका सीरियल किलरच्या गोष्टीवर आधारित आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

१५ ऑगस्टमुळे मोठा वीकेंड, पण तुमचा प्लॅन ठरत नाहीये? घरीच OTTवर पाहा या कलाकृती

‘एमिली इन पॅरिस’ सीझन ४, पार्ट २

अमेरिकन रोमँटिक कॉमेडी ड्रामा सीरिजचा नवीन भाग येतोय. १२ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर ‘एमिली इन पॅरिस’च्या चौथ्या सीझनचा पार्ट टू प्रदर्शित होईल.

‘द परफेक्ट कपल’

अमेरिकन वेब सीरीज ‘द परफेक्ट कपल’ ५ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. ही सीरिज २०१८ मध्ये आलेल्या एलिन हिल्डरब्रँडच्या पुस्तकावर आधारित आहे.

हेडफोनशिवाय बघू नका OTT वरील ‘हे’ चित्रपट, बोल्ड कंटेटचा आहे भडीमार

‘थलावन’

मल्याळम चित्रपट ‘थलावन’ हा सस्पेन्स व थ्रिलरने भरलेला आहे. हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट हिंदीसह इतरही दाक्षिणात्य भाषेत ओटीटीवर पाहता येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Call me bae tanaav 2 the perfect couple sector 36 emily in paris web series on ott in september hrc