OTT Releases This Week: ओटीटीवर मागच्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या. आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातही काही बहुचर्चित व बहुप्रतिक्षित कलाकृती रिलीज होणार आहेत. या वीकेंडला ओटीटीवर अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि सीरिज तुमचं मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्शन, हॉरर, कॉमेडी, थ्रिलर यासह इतरही जॉनर पाहायला मिळतील. देशात जवळपास ६०० कोटींचे कलेक्शन करणारा ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपटही याच यादीत आहे.
एप्रिलचा दुसरा आठवडा म्हणजेच ७ ते १३ एप्रिल २०२५ दरम्यान कोणते नवीन चित्रपट आणि सीरिज विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात.
छावा
Chhaava OTT Release : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. सात आठवड्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकी कौशलचा हा चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार आहे. यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ ओटीटीवर रिलीज होणार आहे. तुम्हाला या वीकेंडला हा चित्रपट घरी बसून पाहता येईल. तुम्ही जर ‘छावा’ मोठ्या पडद्यावर पाहिला नसेल तर तो ११ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपट विकी कौशलसह रश्मिका मंदना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, दिव्या दत्ता, डाएना पेंटी यांच्या भूमिका आहेत.
छोरी 2
Chhorii 2 on OTT : 2021 साली रिलीज झालेल्या ‘छोरी’ चित्रपटाचा सिक्वेल असलेला ‘छोरी 2’ OTT वर धूम ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. या हॉरर चित्रपटात नुसरत भरुचा आणि सोहा अली खान दिसणार आहेत. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल आणि विशाल फुरिया दिग्दर्शित या चित्रपटात गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन आदी कलाकार आहेत.
ब्लॅक मिरर सीझन 7
Black Mirror Season 7 : ‘ब्लॅक मिरर’चे आधीचे सर्व सीझन लोकांना खूप आवडले आणि आता निर्माते त्याचा सातवा सीझन घेऊन आले आहेत. ‘ब्लॅक मिरर सीझन 7’ ही एक प्रसिद्ध सायन्स फिक्शन सीरिज आहे, जी १० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या सीझनमध्ये लोकांना आधीप्रमाणेच अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
द लास्ट ऑफ अस सीझन 2
The Last Of Us Season 2 : ‘द लास्ट ऑफ अस’ ही एक प्रसिद्ध सीरिज आहे, जिचा दुसरा सीझन १४ एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर आता प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज एका व्हिडिओ गेमवर आधारित आहे.
द लीजेंड ऑफ हनुमान
The Legend Of Hanuman Season 6 Release Date : ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ ही ॲनिमेटेड सीरिज असून त्याचे 5 सीझन आतापर्यंत रिलीज झाले आहेत आणि आता सहावा सीझन येणार आहे. हा नवीन सीझन ११ एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. त्यामुळे ज्यांना हनुमानजींच्या कथा आवडतात, त्या प्रेक्षकांसाठी ही एक उत्तम पर्वणी असेल.