‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा भाग सिझन प्रचंड गाजला होता. त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज कायमच चर्चेचा विषय ठरलेली पायला मिळाली. यानंतर आता प्रेक्षकांच्या आग्रहाखातर लवकरच याचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तेसाठीची भूक, विश्‍वासघात आणि शक्तिशाली गायकवाड हे लवकरच सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सिझनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिझनमध्ये गुंतागूंतीची पात्रं, वैयक्तिक संबंध आणि काही अनपेक्षित ट्वीस्‍ट पाहायला मिळणार आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्‍स सीझन ३’ यात राजकारणामध्‍ये सत्ता मिळवण्‍याकरिता अंतिम लढा असणार आहे. लवकरच ही सिरीज डिस्ने + हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
आणखी वाचा : राजकारणाचा रंगतदार सारीपाट: माया नगरी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’-सीजन २

सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सिझनमध्ये आपल्याला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट ही पौर्णिमा आम्रे-गायकवाड हे पात्र साकारताना दिसत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला.

आणखी वाचा : प्रेमाने जखम दिली तर… उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर 

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली होती. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही मालिका नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली होती. ही एक राजकीय ड्रामा सीरीज आहे.