महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) निकाल दिला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. या धामधुमीतच आता बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही वेबसीरिज महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असून, याच्या केंद्रस्थानी गायकवाड कुटुंब पाहायला मिळत आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा भाग सिझन प्रचंड गाजला होता. त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज कायमच चर्चेचा विषय ठरलेली पाहायला मिळाली. यानंतर काही दिवसापूर्वी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर याचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या सिझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये राज्याच्या सत्तेसाठीचा सुरु असलेला संघर्ष, गायकवाड कुटुंबातील कलह आणि विरोधक यांची झलक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : City Of Dreams Season 3 Teaser : “तुम्हारा साहेब अभी रिटायर नहीं हुआ…”, ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
या ट्रेलरमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिकाही दाखवण्यात येत आहे. यात “लोकशाहीचा चौथा स्तंभ इतर तीन खांब पाडून टाकेल”, असा डायलॉगही पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये काही दृश्य पाहिल्यानंतर हा सिझन फारच खास असणार असल्याचे दिसत आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही मालिका नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली होती. ही एक राजकीय ड्रामा सीरीज आहे.या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट ही पौर्णिमा आम्रे-गायकवाड हे पात्र साकारताना दिसत आहे.
आणखी वाचा : सत्तेसाठी अंतिम लढा, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सिझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला. तर या वेबसीरिजचा दुसरा सिझन ३० जुलैला प्रदर्शित झाला होता. यानंतर आता येत्या २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसरा सिझन डिस्ने + हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.