City Of Dreams Season 3 Teaser : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा भाग सिझन प्रचंड गाजला होता. त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज कायमच चर्चेचा विषय ठरलेली पाहायला मिळाली. यानंतर आता ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सिझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सिझनचा टीझर अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केला आहे. यात अतुल कुलकर्णी हे राज्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलताना दिसत आहेत. हा टीझर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा : सत्तेसाठी अंतिम लढा, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

“मजाक बना के रखा है राज्य के पॉलिटिक्स का, हर कोई फटाफट पार्टी बदल रहा है. जब अपने सगेही कुर्सी खिचने लगते हे तो…, अभी तो इस राज्य की संगीत कुर्सी मै राजधानी को भी मौका चाहिए, लेकीन इस राज्य रिमोट कंट्रोल दिल्लीसे हमेशा दूर ही रहेगा, ये वादा है… एक गायकवाड का…. तुम्हारा साहेब अभी रिटायर नहीं हुआ हे”, असे दमदार डायलॉग या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत.

सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सिझनमध्ये आपल्याला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट ही पौर्णिमा आम्रे-गायकवाड हे पात्र साकारताना दिसत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला. लवकरच ही सिरीज डिस्ने + हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली होती. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही मालिका नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली होती. ही एक राजकीय ड्रामा सीरीज आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City of dreams season 3 teaser disney hotstar atul kulkarni priya bapat sachin pilgaonkar political drama see video nrp