ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्डप्ले’ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. मुंबईत १८ आणि १९ जानेवारी २०२४ रोजी या बँडचे कॉन्सर्ट्स झाले. श्रेया घोषालपासून अनेक सेलिब्रिटी ‘कोल्डप्ले’च्या ‘म्युजिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर’मध्ये सहभागी झाले होते. आता अहमदाबादमध्ये २५ आणि २६ जानेवारी २०२५ रोजी या बँडचे लाइव्ह परफॉर्मन्स होणार आहेत. जर तुम्हाला कॉन्सर्टची तिकिटे मिळाली नसतील , तर तुम्ही घरी बसून हे लाइव्ह पाहू शकता. होय, OTT वर कोल्डप्लेचे अहमदाबाद कॉन्सर्ट लाइव्ह स्ट्रीम केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्डप्ले आणि OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar यासाठी करार केला आहे. या अंतर्गत २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अहमदाबादच्या सर्वात मोठ्या स्टेडियममधील कोल्डप्लेचे कॉन्सर्ट लाइव्ह प्रसारित केले जाईल. बँडच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे कारण भारताच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर फक्त काही मिनिटांच्या वेळात या कॉन्सर्टची तिकिटे सोल्ड आऊट झाली होती.

लाइव्ह कॉन्सर्टबरोबर बिहाइंड द सीन फुटेजही

या कॉन्सर्टची लाईव्ह प्रसारणातील मजेदार गोष्ट म्हणजे, #ParadiseForAllचा अनुभव देण्यासाठी OTT प्लॅटफॉर्म फक्त कॉन्सर्टचे लाइव्ह स्ट्रीमच नव्हे तर बँडच्या बिहाइंड-द-सीन एक्सक्लूसिव्ह फुटेजही दाखवले जाणार आहे.

या बंडचा गायक क्रिस मार्टिन याविषयी बोलताना म्हणाला, ‘आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की २६ जानेवारी २०२५ रोजी अहमदाबादमध्ये आमचे शो ‘Disney Plus Hotstarवर लाइव्ह स्ट्रीम होईल. आपण भारतातील कोणत्याही ठिकाणाहून हे पाहू शकता.

कोल्डप्लेचे अहमदाबाद कॉन्सर्ट २६ जानेवारी, २०२५ रोजी ‘डिझ्नी+ हॉटस्टार’वर संध्याकाळी ६ वाजेपासून स्ट्रीम होईल. हे पाह्ण्यासाठी आपल्याकडे OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन असणे गरजेचे आहे.