करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शो सुरुवातीपासून चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि करण गप्पांमध्ये त्यांच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी आणि त्यांच्याबद्दलची काही गुपितं सर्वांसमोर आणत असतो. त्यासोबतच तो या कार्यक्रमात आलेल्या सेलिब्रिटींबरोबर वेगवेगळे खेळही खेळतो. या खेळांमध्ये जो सेलिब्रिटी जिंकेल त्याला करण एक खास गिफ्ट हॅम्पर देतो. या हॅम्परमध्ये काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असतं. आता ते गुपित उघड झालं आहे.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ‘रॅपिड फायर राउंड’ जिंकणाऱ्या सेलिब्रिटीला हे खास गिफ्ट हॅम्पर दिलं जातं. हे हॅम्पर जिंकण्यासाठी सगळेच सेलिब्रिटी प्रयत्न करतात. त्यासाठी ते मजेशीर उत्तरं देताना आणि भांडतानाही दिसतात. प्रेक्षकांबरोबरच हे हॅम्पर सेलिब्रिटींसाठीही आकर्षणाचा भाग ठरलं आहे. या शोमध्ये प्रदर्षित झालेल्या एका भागात कॉमेडियन तन्मय भट्ट आणि त्याचा ‘एआयबी’तील सहकलाकर रोहन जोशी यांनी हजेरी लावली. आता त्यांनी या हॅम्परमध्ये कायकाय असतं हे प्रेक्षकांना दाखवलं. या हॅम्परचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे.

आणखी वाचा :“…अजूनही माझा थरकाप उडतो”, अनुपम खेर यांनी सांगितला होता ‘हॉटेल मुंबई’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव

कॉफी विथ करणच्या या खास गिफ्ट हॅम्परमध्ये फेमस ब्रँडची चहा पावडर, कॉफी, एक हटके टी पॉट, ऑडी एस्प्रेसो मेकर, अमेझॉन इको शो १०, करण जोहरचा ज्वेलरी ब्रँड ‘त्यानी’ची ज्वेलरी, मार्शल स्पीकर्स, न्यूहॉस चॉकलेट्स कलेक्शन डिस्कवरी बॉक्स, बॉम्बे स्वीट शॉप, खोया स्वीट, २८ बेकर स्ट्रीट, कॉफी विथ करणचा कॉफी कप या सर्व गोष्टी समाविषय असतात. जो सेलिब्रिटी रॅपिड फायर राउंड जिंकेल त्याला हे हॅम्पर भेट म्हणून दिलं जातं.

हेही वाचा : “प्रवास अजूनही सुरुच आहे…”, ‘सॅम बहादुर’च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल भावूक

आतापर्यंत अनेक नामावंत सेलिब्रिटींनी हे गिफ्ट हॅम्पर जिंकलेलं आहे. यात आलिया भट्ट, जान्हवी जपूर, अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, आमिर खान या सेलिब्रिटींचा समावेश आहे

Story img Loader