आयुष्यात हसत राहण्यापेक्षा मोठे औषध काहीच नाही, असे म्हटले जाते. माणूस हसत असला की तो तणावमुक्त राहतो. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांसाठी तणावमुक्त राहणे सोपे नाही. अशा परिस्थितीत मनाला आनंद देण्यासाठी फक्त मनोरंजनच एक पर्याय राहतो.
ओटीटीवर (OTT) घरबसल्या चित्रपट आणि सीरिजचा आनंद घेता येतो. यावर अनेक सदाबहार कॉमेडी चित्रपट उपलब्ध आहेत. त्याशिवाय काही नवे चित्रपटही आहेत, जे पाहून तुमचा दिवस आनंदात जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, हे चित्रपट प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) वर पाहायला मिळतील.
चुपके-चुपके
धर्मेंद्र यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ‘चुपके-चुपके’ हा चित्रपट प्राइम व्हिडीओ उपलब्ध आहे. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. धर्मेंद्र यांचा डबल रोल असलेला हा चित्रपट एक जबरदस्त कॉमेडी आहे. या चित्रपटातील संवादांपासून ते प्रसंगांपर्यंत सर्वकाही उत्कृष्ट आहे. तुम्ही हा चित्रपट तुमच्या कुटुंबाबरोबर आनंदाने पाहू शकता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जया बच्चन, ओम प्रकाश, आसरानी, उषा किरण, डेविड अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा…या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…
बावर्ची
राजेश खन्ना यांचा हा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि आजही आवडतो. या चित्रपटाला IMDB वर ८.१ रेटिंग मिळाली आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. या चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबर जया बच्चन, आसरानी यांसारखे प्रतिभावान कलाकार होते.
हेरा-फेरी
२००० साली प्रदर्शित झालेला ‘हेरा-फेरी’ हा बॉलीवूडमधील सर्वोत्तम कॉमेडी चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचे दोन भाग आले आहेत आणि प्रेक्षक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियदर्शन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची जोडी आहे. त्याचबरोबर तब्बू, ओम पुरी आणि गुलशन ग्रोवर यांनीही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर हा पाहू शकता.
हेही वाचा…Pataal Lok 2 Trailer: जबरदस्त गूढ, अॅक्शन आणि ‘ती’ तारीख…, ‘पाताल लोक २’ चा ट्रेलर प्रदर्शित
गोलमाल – फन अनलिमिटेड
या चित्रपटाचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत आणि पाचव्या भागावर काम सुरू आहे. बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कॉमेडी चित्रपटांपैकी हा एक मानला जातो. या चित्रपटात अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि शर्मन जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा…दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
वेलकम
२००७ साली प्रदर्शित झालेला ‘वेलकम’ हा चित्रपट एक उत्कृष्ट कॉमेडी चित्रपट मानला जातो. अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या जोडीने यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. अक्षय कुमार, फिरोज खान, कॅटरिना कैफ, परेश रावल आणि मल्लिका शेरावत यांचाही यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.