‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी नव्या सीरिजची घोषणा केली आहे. ‘कमांडो’ ही ॲक्शन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अभिनेत्री अदा शर्मा आणि अभिनेता प्रेम परिजा मुख्य भूमिकेत दिसतील. प्रेम आणि अदा शर्माबरोबर कमांडोमध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा : ‘रॉकी और रानी…’ चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, “करण जोहर सर…”
‘कमांडो’ या ॲक्शन वेब सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी ‘क्षितिज मेहरा’ या भारतीय SPY एजंटची भूमिका साकारणार आहे. पाकिस्तानचे बायोवेपन उद्धवस्थ केल्यामुळे क्षितिजला अटक करण्यात येते. त्याला पाकिस्तानच्या तुरुगांतून सोडवण्यासाठी विराट (प्रेम परिजा ) आणि भावना रेड्डी (अदा शर्मा) यांना मिशनवर पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा : “प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट…”, बॉलीवूड पीआरबद्दल नोरा फतेहीने केला मोठा खुलासा; म्हणाली, “कोणाचेही न ऐकता…”
आता विराट आणि भावना क्षितिजला पाकिस्तानच्या तुरुंगातून कसे सोडवणार? त्यांना यश मिळणार की नाही? या सगळ्याचा उलगडा ११ ऑगस्टला होणार आहे. हॉटस्टार स्पेशल ‘कमांडो’ ही सीरिज ११ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटात अभिनेता विद्युत जामवालने मुख्य भूमिका साकारली होती.
निर्माते विपुल शाह या सीरिजविषयी सांगताना म्हणाले, “‘कमांडो’ ही देशाला आपले जीवन समर्पित केलेल्या एका नायकाची कथा आहे. सीरिजमधील जबरदस्त ॲक्शन प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” दरम्यान, या सीरिजमध्ये अदा शर्मा आणि प्रेम परिजा यांच्याशिवाय वैभव तत्ववादी, श्रेया सिंग चौधरी, अमित तिग्मांशू धुलिया, मुकेश छाबडा, इश्तियाक खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.