‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एल्विशविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याने एका रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात यूट्यूबर एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ गारुडींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले आहे. त्यांनी सांगितलं की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

“माझी प्रेमळ आई जे करतेय ते…”, आराध्याने केलं ऐश्वर्या रायचं कौतुक; लेकीचं बोलणं ऐकून भारावली अभिनेत्री, पाहा VIDEO

पीपल फॉर अॅनिमल्स या एनजीओमध्ये कल्याण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की एल्विश यादव त्याच्या साथीदारांसह नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसवर बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असल्याची माहिती मिळाली होती. या पार्ट्यांमध्ये परदेशी मुलींना नियमित बोलावले जाते आणि ते सापाचे विष आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करतात. या माहितीवरून आमच्या एका माहितीदाराने एल्विश यादवशी संपर्क साधला आणि त्याला नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यास आणि कोब्राच्या विषाची व्यवस्था करण्यास सांगितले. एल्विशने त्याच्या एजंट राहुलचा फोन नंबर दिला आणि माझं नाव सांगून बोला, तो सर्व व्यवस्था करेल असे सांगितले. यासंदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.

तक्रारीनुसार, माहिती देणाऱ्याने राहुलशी एल्विशच्या नावाने बोलताच त्याने रेव्ह पार्टी आणि इतर व्यवस्था करण्यास होकार दिला. माहिती देणाऱ्याने त्याला नोएडाच्या सेक्टर ५१ मध्ये असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये बोलावले आणि डीएफओ नोएडा आणि पोलिसांना याची माहिती दिली. राहुल व इतर लोक तिथे पोहोचले. त्याने सोबत ९ सापाचे विष आणले होते. दरम्यान, पोलिसांनी तिथे पोहोचून सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एल्विश यादवसह सहा आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

दरम्यान, वनविभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन केले होते आणि नोएडा पोलिसांना तक्रार दिली होती, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint filed against elvish yadav for providing snake poison in rave party hrc