बॉलिवूडमध्ये आजवर गुन्हेगारी क्षेत्रावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले आहेत. ओटीटी विश्वातदेखील मिर्झापूर या वेबसीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या वेबसीरिजचे दोन सीजन प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही सीजन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. मात्र आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मिर्झापूर’ परतत असल्याच्या वृत्ताने वेबसीरिजचे चाहते खूप खूश आहेत.

या वेबसीरिजचे लाखो चाहते जरी असले तरी या तिसऱ्या सीजनवर बंदी घालण्याची एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. एवढेच नाही तर न्यायालयाने याचिकाकर्त्याला अधिक चांगली याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलेली दृश्य, भाषा यामुळे बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या सीरिजचे प्री-स्क्रीनिंग करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मिर्झापूर येथील एका रहिवाश्याने याचिका दाखल केली होती.

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

‘आदिपुरुष’ चित्रपटामागचे ग्रहण संपेना; हिंदू सेनने उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

मध्यंतरी या वेबसीरिजमध्ये बीना त्रिपाठी हे पात्र साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मिर्झापूर ३’ वेबसीरिजच्या तयारीला आम्ही सुरुवात केली आहे असं रसिकाने तिच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. कालीन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका रसिका या वेबसीरिजमध्ये साकारताना दिसणार आहे.

अमेझॉन प्राईमची ही वेबसीरिज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवर आधारित आहे. पंकज त्रिपाठी, कालिन भैय्या, अली फझल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसारख्या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे. आता या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये वेगळं काय पाहायला मिळणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.